Home /News /maharashtra /

यवतमाळ: शेतकऱ्यांसाठी वंचितचं ‘चटणी भाकर’ आंदोलन, तहसील ऑफिससमोरच पेटवली चूल!

यवतमाळ: शेतकऱ्यांसाठी वंचितचं ‘चटणी भाकर’ आंदोलन, तहसील ऑफिससमोरच पेटवली चूल!

शेतकऱ्याला कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढायचं असेल तर 2009 ते 2016 पर्यंत संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

यवतमाळ 06 ऑक्टोबर: यवतमाळ जिल्हयात घाटंजी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चटणी भाकर एल्गार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन कर्त्यांनी तहसील ऑफिसच्या समोरच चूल पेटवत चटणी भाकर तयार केली. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून होत असलेल्या नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याला कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढायचं असेल तर 2009 ते 2016 पर्यंत संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. CCIची कापूस खरेदी लवकर सुरू करावी, सोयाबीनची शासकीय खरेदी त्वरीत चालू करा, घाटंजी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला द्या या मागण्या घेऊन बहुजन वंचित आघाडीच्या वतीने घाटंजी तहसीलदार कार्यालय समोर चटणी भाकर आंदोलन करण्यात आले. आंदोलन स्थळी महिलांनी चटणी भाकर तयार करून शासनाच्या धोरणाचा निषेध केला. उघड्या गटारीचा बळी! घाटकोपरला गायब झालेल्या महिलेचा मृतदेह सापडला हाजीअलीला यावर्षी सोयाबीनचे पेरा वाढलेला आहे. मात्र पावसामुळे त्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. सतत काही दिवस पाऊस राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यातच कोरोनामुळे आर्थिक चक्रच मंदावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पिकवलं तर भाव नाही,  जेव्हा भाव असतो तेव्हा माल नसतो. मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचा गोंधळ, Online परीक्षा देता न आल्याने संताप दलालांचा सुळसुळाट यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही येत नाही. त्यामुळे नुसत्या घोषणा करून उपयोग नाही तर शेतकऱ्यांसाठी ठोस कार्यक्रम तयार करा अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Farmer, Yavatmal news

पुढील बातम्या