Home /News /maharashtra /

भीषण अपघात! पंक्चर काढणाऱ्या दोघांना झायलोने जागीच चिरडलं, पुढे जाऊन कारही झाली पलटी

भीषण अपघात! पंक्चर काढणाऱ्या दोघांना झायलोने जागीच चिरडलं, पुढे जाऊन कारही झाली पलटी

पिकअपचा पंचर टायर दुरुस्त करत असलेल्या ड्राइवर आणि क्लीनरला मागून आलेल्या भरधाव झायलो गाडीने धड़क देत फरफटत नेलं.

    भंडारा, 04 फेब्रुवारी : भंडाऱ्यामध्ये एक भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भीलेवाड़ा पेट्रोल पंपाजवळ उभ्या पिकअप गाडीच्या चालक आणि क्लीनरला कारने धडक दिली आहे. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. इतकंच नाही तर धडक देणारी झायलो कार पुढे जाऊन पलटली. त्यामुळे त्यात असलेले 4 प्रवाशीदेखील जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. पिकअपचा पंचर टायर दुरुस्त करत असलेल्या ड्राइवर आणि क्लीनरला मागून आलेल्या भरधाव झायलो गाडीने धड़क देत फरफटत नेलं. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. झायलो गाडी भरधाव वेगात असल्यामुळे ड्रायव्हर आणि क्लीनरला चिरडल्यानंतर कार पुढे जाऊन पलटली. त्यामळे गाडीतील 4 प्रवाशी जखमी झाले आहे. जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, महामार्गावर हा भीषण अपघात झाल्यामुळे काही तासांसाठी महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळारून 2 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवले आहेत. तर पुढील तपास सुरू आहे. इतर बातम्या - Opinion poll: अमित शहा VS अरविंद केजरीवाल, वाचा कोण जिंकणार दिल्लीचा गड? दरम्यान, पंढरपूरमध्येही आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे 108 रुग्णवाहिकेला वेगात धडक दिली. यामध्ये वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. चडचण-सोड्डी रोड जवळ अज्ञात वाहनाने रुग्णवाहिकेला धडक दिली. या अपघातामध्ये वाहन चालकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. सतीश भीमराव देवकते असं मृत झालेल्या चालकाचं नाव आहे तर पोपट देवकते यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. सतीश भीमराव देवकते हे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या 108 गाडीचे चालक म्हणून काम करत होते. जनावरांना वैरण पाहण्यासाठी सतीश देवकते व त्यांचे चुलते पोपट देवकते चडचणला गेले होते. ते कामावर जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. इतर बातम्या - ‘नाइट लाइफ’ म्हणजे फक्त मौजमजा, छंद-फंद नाहीत - उद्धव ठाकरे सतीश देवकते यांचा डोक्याला मार लागल्याने भरपूर रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला असून त्यांचे चुलते पोपट देवकते हे या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चडचण येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सतीश देवकते भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 रुग्णवाहिका वर चालक म्हणून कार्यरत होते सतीश देवकते हे प्रहार जनशक्ती सांगोला तालुका अध्यक्ष आहेत. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. इतर बातम्या - अशी अद्दल घडलीच नसेल! तोंडात रॉकेल घेऊन करत होता आगीचे खेळ आणि...

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या