महिला पोलिसाचा चीनमध्ये विक्रम, 'टार्गेट आर्चरी'मध्ये पटकावली तीन पदके

बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला कॉन्स्टेबल मोनाली हर्षचंद्र जाधव यांनी पोलीस क्रीडा स्पर्धेच देशाचे प्रतिनिधीत्व करत तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 05:47 PM IST

महिला पोलिसाचा चीनमध्ये विक्रम, 'टार्गेट आर्चरी'मध्ये पटकावली तीन पदके

अमोल गावंडे, (प्रतिनिधी)

बुलडाणा, 22 ऑगस्ट- चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत भारतीय पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलने विक्रम प्रस्थापित केला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला कॉन्स्टेबल मोनाली हर्षचंद्र जाधव यांनी पोलीस क्रीडा स्पर्धेच देशाचे प्रतिनिधीत्व करत तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली. 'टार्गेट आर्चरी'मध्ये 720 पैकी 716 गुण मिळवित दोन सूवर्ण पदके व एक कांस्य पदक पटकावले. मोनाली जाधव 2013 मध्ये पोलीस दलात दाखल झाल्या. त्या बुलडण्यामधील आनंद नगर येथील राहवासी असून त्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. सध्या त्या जलंब पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे.

चीनच्या चेंगडू येथे 8 ते 18 ऑगस्ट दरम्यान जागतिक पोलीस क्रिडा स्पर्धा झाल्या. यामध्ये मोनालीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले. फिर्ल्ड आर्चरीमध्ये सूवर्ण, तर 'थ्रीडी' आर्चरी प्रकारात कांस्य पदक मिळविले. मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत जागतिक स्तरावर नववे स्थान पटकावले होते. मोनाली जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग, सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन, तसेच पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळाले. मोनालीच्या या यशाबद्दल बुलडाणा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले. बुलडाणा जिल्ह्यातून मोनालीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मोनाली बारावीत असताना तिच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. घरातील कमावता पुरुष गेल्याने सर्व जबादारी आईवर आली होती. आईला मदत व्हावी आणि मोनालीने शिक्षण व्हावे यासाठी मोनालीच्या मोठ्या भावाने आपले शिक्षण बंद करून मजुरी करायला सुरुवात केली. आई आणि भाऊ मजुरी करून आपला प्रपंच चालवत होते , हे पाहत असताना कुटुंबासाठी आपणही मदत करावी, अशी भावना मोनालीच्या मनात येत होती. त्याच वेळी महाराष्ट्र पोलीसची भरती निघाली. खेळात लहानपणापासूनच आवड असल्याने मोनालीने पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पार केली. बुलडाणा पोलीस शिपाई म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

सैन्यदलातून निवृत्त होऊन मोनालीच्या बॅचमध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती झालेले चंद्रकांत तिलक यांनी मोनालीच्या खेळाडू वृत्ती पाहून आणि तिला तिरंदाजी बद्दल मार्गदर्शन केले. विविध स्पर्धा खेळण्यासाठी तिच्या पोलीस विभागाने देखील पाठीशी उभे राहत रजा मंजूर केली आणि त्यानंतर मात्र मोनालीचा खरा प्रवास सुरु झाला ज्यामध्ये मोनालीने विभाग ते राष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रशिक्षकांचे डावपेच आणि कुशल बुद्धिमत्तेने प्रथम क्रमांक पटकावत अनेक पदके पटकावली.

Loading...

बुलडाणा जिल्हा पोलिस दलातील महिला पोलीस शिपाई मोनाली जाधव सन 2013 मध्ये पोलीसमध्ये भरती झालेली आहे आणि आज संपूर्ण राज्याचा नव्हे तर संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करून चीनमध्ये या जागतिक क्रीडा स्पर्धा होत आहेत त्याठिकाणी तिने दोन सूवर्ण आणि एक कांस्य पदक मिळवलेले आहे. पोलीस दलाची शान वाढवली आहे एचडी मध्ये तिला दोन सुवर्ण आणि डेअरीमध्ये कास्य पदक प्राप्त झालेला आहे आणि तिरंदाजी सारख्या एका आगळ्या-वेगळ्या खेळामध्ये त्यांनी आपल्या देशाचे नेतृत्व करून भारताची मान अखिल भारतीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर उणचवलेली आहे. त्याबद्दल बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी मोनालीचे अभिनंदन केले आहे.

VIDEO : 'राज ठाकरेंच्या बाबतीत अनुचित प्रकार घडला तर आम्ही...', मनसे नेत्याचा थेट इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2019 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...