बर्फी घ्या... बाळंतपणासाठी माहेरी जाताना महिलेनं बसमध्येच दिला कन्यारत्नाला जन्म!

बर्फी घ्या... बाळंतपणासाठी माहेरी जाताना महिलेनं बसमध्येच दिला कन्यारत्नाला जन्म!

ग्रामीण भागात एस.टी.ला खास महत्त्व आहे. वाहतुकीचं तेच एक मोठं साधन असल्याने एस.टीचं नागरिकांच्या आयुष्यात मोठं स्थान आहे. त्यामुळेच तिला लालपरी असंही म्हटलं जातं.

  • Share this:

संजय शेंडे, अमरावती 29 नोव्हेंबर : ग्रामीण भागात एस.टी.ला खास महत्त्व आहे. वाहतुकीचं तेच एक मोठं साधन असल्याने एस.टीचं नागरिकांच्या आयुष्यात मोठं स्थान आहे. त्यामुळेच तिला लालपरी असंही म्हटलं जातं. याच बसमध्ये घडलेल्या घटना कायम चर्चेच्या विषय बनतात. अमरावती जिल्ह्यात एस.टी.बसमध्ये घडलेले एक घटना सर्व जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलीय. या घटनेनं बसच्या चालक आणि वाहकांचही कौतुक होतंय. या चालक आणि वाहकानं प्रसंगावधान राखून जे काम केलं त्यामुळे त्यांचं हे कौतुक होतंय. ही घटना अमरावती जिल्ह्यातली आहे. यावली शहीद गावातील महिला प्रसूतीसाठी आपल्या पतिसह माहेरी जात होती. यवतमाळ जिल्ह्यातील दही सावळी हे तिचं माहेर. महिलेला आठवा महिना सुरू होता. या गावी एस. टी. बसने  माहेरी जात असताना मध्येच या गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यात.

उद्धव ठाकरेंची उद्या 'अग्निपरीक्षा', विजयासाठी शिवसेनेचा 'मास्टर प्लान'

त्यामुळे सर्व बसमध्येच चलबिचल सुरू झाली. कुणी डॉक्टर आहे का? याचीही विचारणा झाली. मात्र बसमध्ये डॉक्टर नव्हता. त्यामुळे लोकांनी बस थेट दवाखाण्यात घेऊन जायला सांगितलं. चालक आणि वाहकानेही समयसूचकता दाखवत बस सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला.

आज रश्मी वहिनींचा किती वेळा फोन आला? काय म्हणाले उद्धव ठाकरे!

त्यांनी बस थेट अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर इथं नेली. बस नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयाजवळ जाताच महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बसच्या चालक आणि वाहकाच्या समय-सुचकतेने आई व तिच्या बाळाचे प्राण वाचल्याने चालक वाहकाचेही कौतुक केलं जात आहे.

 

First published: November 29, 2019, 9:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading