संशयी पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.. झोपेतच डोक्यात घातली कुऱ्हाड

संशयी पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.. झोपेतच डोक्यात घातली कुऱ्हाड

पत्नी झोपली असताना पतीने तिच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिची निर्घृण हत्या केली आहे.

  • Share this:

किशोर गोमाशे,(प्रतिनिधी)

वाशिम, 29 सप्टेंबर: पत्नी झोपली असताना पतीने तिच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिची निर्घृण हत्या केली आहे. आईला वाचवण्यासाठी धावून आलेला मुलगाही यात गंभीर जखमी झाला आहे. जिल्ह्यातील चोरद गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेली माहिती अशी की, वाशिम जिल्ह्यातील चोरद येथे शनिवारी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शोभा झाटे ( वय-40) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विठ्ठल झाटे असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. विठ्ठल झाटे हा पत्नीवर कायम संशय घेत होता. त्यावरून पत्नीशी वाद घालत होता. शनिवारीही रात्री झोपण्यापूर्वी त्याने पत्नीशी भांडण केले होते. विठ्ठल झाटे याने मध्यरात्री 1:30 वाजता कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत असताना पत्नी शोभा झाटे हिच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. कुऱ्हाडीचा घाव वर्मी लागून मोठा रक्तस्त्राव झाल्यामुळे शोभा झाटे यांचा जागेवरच मृत्यू झाला.

आईवर वडिलांनी कुऱ्हाडीने वार केल्यावर मोठा मुलगा अमर झाटे हा तिच्या मदतीसाठी धावून आला. विठ्ठल झाटे याने आपल्या मुलावरही कुऱ्हाडीने वार केला. यात तोही जखमी झाला. पत्नीचा खून केल्यानंतर विठ्ठल झाटे हा फरार झाला होता. रविवारी सकाळी मंगरुळपीरचे ठाणेदार विनोद दिघोरे व उपनिरीक्षक मंजू मोरे यांनी मोठ्या शिताफीने त्याला येडशी कुंड या गावातून अटक केली.

विठ्ठल झाटे याने पत्नी शोभा झाटेचा केवळ संशयावरुन निर्घृण केल्यामुळे अमर, ममता, मोनिका व अक्षय ही 4 मुले आई वडिलांपासून पोरकी झाली आहेत. घटस्थापनेच्या दिवशी झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2019 11:55 PM IST

ताज्या बातम्या