• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • लहरी हवा! वातावरण पुन्हा बदलणार; राज्यात इथे होणार अवकाळी पाऊस

लहरी हवा! वातावरण पुन्हा बदलणार; राज्यात इथे होणार अवकाळी पाऊस

Maharashtra weather updates: बदललेल्या हवेची झळ महाराष्ट्रालाही जाणवणार अशी चिन्हं आहेत. वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे राज्याच्या काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 12 मार्च: देशाच्या राजधानीत शुक्रवारी सकाळीच दाटून आलेल्या अंधाराने लहरी हवेचा अंदाज आला होता आता त्या बदललेल्या हवेची झळ महाराष्ट्रालाही जाणवणार अशी चिन्हं आहेत. वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे राज्याच्या काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या दोन दिवसात विदर्भात विजांसह वादळी पाऊस होऊ शकतो. पश्चिम विदर्भावर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून पुढे दोन-तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या पावसाबरोबर वादळी वारे आणि विजांचा कडकडाटही होऊ शकतो. त्यामुळे आकाशात ढगांची गर्दी दिसली तर शक्यतो उघड्या शेतावर कामाला जायचं टाळा, असा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने अकोला जिल्हा आणि पश्चिम विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल. VIDEO:दिल्ली-NCRमध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी, उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासूनच वातावरण तापू लागलं होतं. मार्चमध्ये तर पहिल्या आठवड्यातच पारा चाळिशीला टेकला आणि अचानक थंडी गायब होऊन झळा सुरू झाल्या. या अशा ढगाळ वातावरणामुळे थोडी काहिली कमी होण्याची शक्यता असली, तरी हा दिलासा पुरेसा नाही. उन्हाचा तडाखाही वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातही हवा बदलणार भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातही सायंकाळनंतर ढगांची गर्दी होऊ शकते. रत्नागिरी, सिंधूदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र, पुणे, नगर या भागातही वातावरण ढगाळ राहू शकतं. अवकाळी पावसामुळे हातात आलेली पिकं खराब होण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी नजिकच्या कृषी केंद्रावर हवामाना संबंधी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
  First published: