सरकारमध्ये आमचा हस्तक्षेप असतो, पण...मोहन भागवतांनी उघड केलं मोठं गुपित

सरकारमध्ये आमचा हस्तक्षेप असतो, पण...मोहन भागवतांनी उघड केलं मोठं गुपित

'संघ हा नियमांनुसार चालतो. इथे शिस्त आहे. मी सरसंघचालक नसणार तेव्हा संघाचा सर्वसामान्य स्वयंसेवक असेल.'

  • Share this:

प्रशांत मोहिते, नागपूर 16 ऑगस्ट : संघ परिवारातल्या लघु उद्योग भारती या संस्थेच्या रजत जयंती महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाची सुरूवात आज नागपूरात झाली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. देशात सध्या मंदीचं वातावरण आहे. वाहन आणि बांधकाम व्यवसायाची गती मंदावली आहे. त्यामुळे सरसंघचालक काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लगालं होतं. मोहन भागवतांनी देशभरातून आलेल्या व्यावसायीकांना मार्गदर्शन करत सरकारलाही सल्ले दिले आणि अनेक गोष्टी स्पष्ट केल्या.

मोफत 'मिक्सर'ची भाजप आमदाराची घोषणा बेतली महिलांच्या जीवावर

संघाचा सरकारवर वचक असतो की नाही याबद्दल कायम चर्चा केली जाते. यावेळी बोलताना भागवत म्हणाले, सत्तेत आपल्या विचाराचे लोक आहेत. पण ते एका तंत्रात आहे. त्यांच्या मनात योग्य विचार असूनंही त्यांनी केलेली सर्व कामं योग्य असतीलच असं नाही. सरकारी धोरणात आम्ही हस्तक्षेप करतो, पण तो हस्तक्षेप समाज हितासाठी आहे. संघाचा प्रभाव दाखवण्यासाठी नाही.

देशातील  उद्योगपतींमध्ये देशाची संस्कृती आहे, म्हणून ते दान करतात. संविधानामुळे राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य येईल, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. जगातील सर्व संपत्ती काही मोठ्या लोकांकडे आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या आधी कंपन्या नव्हत्या, पण उद्योग सुरु होते. आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वावलंबनाची गरजेचं आहे.

काश्मीरींसाठी विशेष प्रार्थना; MIM चे आमदार वारीस पठाण पोलिसांच्या ताब्यात

उद्योग जेवढे वाढतील, तेवढेच लोकांचे आर्थिक व्यवहार वाढतील. देशात मानसिक स्वातंत्र्य आल्यावरच आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य येईल. विरोधी पक्षाचं काम हे विरोध करणं नाही, तर सत्तापक्षाच्या ज्या बाबी लक्षात येत नाही त्या आणून देणं हे आहे.

देशात आर्थिक स्वातंत्र्य असावं असं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, तर डॉ. हेडगेवार देशाला आर्थिक चंगुलापासून मुक्त करा असं म्हणायचे. नागपूरात १९२० साली झालेल्या काँग्रेस अधिवेशनात हेडगेवार यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. परिवर्तन क्रांतीने येत नाही, उत्क्रांतीने येते असंही ते म्हणाले.

नाशिक बाजार समितीला ग्रहण, सभापतीला लाच घेताना अटक

संघ हा नियमांनुसार चालतो. इथे शिस्त आहे. मी सरसंघचालक नसणार तेव्हा संघाचा सर्वसामान्य स्वयंसेवक असेल असंही मोहन भागवत यांनी सांगितलं. 18 ऑगस्ट पर्यंत हा कार्यक्रम चालणार असून या कार्यक्रमात नितीन गडकरी, पीयुष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 07:02 PM IST

ताज्या बातम्या