हर्षल महाजन, नागपूर 23 ऑगस्ट : राज्यातल्या विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर आल्या आहेत. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. असं असताना काँग्रेस पक्षातला गोंधळ संपण्याची काही चिन्हे नाहीत. राज्यातले विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हेच पक्षाच्या निर्णयावर नाराज आहेत. महत्त्वाच्या समितीतच डावलण्याने ते नाराज आहेत. हे पक्षातलं राजकारण असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे आधीच विस्कळीत झालेल्या काँग्रेसमध्ये अजुनही काहीही सुधारणा झालेली नाही असंच म्हटलं जातेय.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने नुकतीच आपली निवड समिती जाहिर केलीय. पण या कमिटीत विरोधी पक्ष नेते असलेल्या विजय वडेट्टीवार यांचं नाव नाही. निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या समितीतच आपलं नाव नसल्याने वड्डेटीवार नाराज आहेत.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या भूमिकेबाबत केला मोठा खुलासा!
वडेट्टीवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निवड समिती माझं नाव नसल्यानं आश्चर्य वाटलं, यापूर्वी निवड समिती विरोधी पक्ष नेत्याचं नाव असायचं, पण यावेळी नाही. या समितीत माझं नाव नाही हे राजकारण आहे. मला महाराष्ट्रातील मतदारसंघांची माहिती आहे असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. पण नाराज नसल्याचंही त्यांनी केलं स्पष्ट.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची निवड करण्यासाठी सोनिया गांधी यांनी एका समितीची नियुक्ती जाहीर केली होती. काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे हे यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. या समितीत हरिश चौधरी, मनिकम टागोर हे सदस्य तर ज्येष्ठ नेते मलिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नेते के. सी. पडवी यांचा समावेश करण्यात आलाय.
हेही वाचा - भाजप जिंकलं तरी मंत्रिमंडळ आमचंच, सुप्रिया सुळेंनी सांगितला 'हा' फॉर्म्युला
मुख्यमंत्र्यांच्या गुगलीने राजकीय चर्चेला सुरुवात
राज्यात देवेंद्र आणि दिल्लीत नरेंद्र अशी घोषणा राज्यात कायम दिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आपलं स्थान मजबूत केलंय असं मानलं जातं. राज्या ज्या मोजक्या मुख्यमंत्र्यांना सलग पाच वर्ष पूर्ण करायला मिळाली अशा मोजक्या नेत्यांचामध्ये त्यांचा समावेश होतो. महाजनादेश यात्रेवर निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी आज गुगली टाकत सगळ्यांनाच धक्का दिला. मी काही काळ राज्यात आहे, मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा माझी दिल्लीत जाण्याची तयारी आहे असं त्यांनी न्यूज18 लोकमतला दिलेल्या Exclusiveमुलाखतीत सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चेला उधाण आलंय.
उदयनराजे पक्षात आले तर आनंदच
मुख्यमंत्री म्हणाले, आमची परीक्षक जनता आहे. महाजनादेशाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आम्ही अपेक्षा पूर्ण करु याचा लोकांना विश्वास वाटतो. आमच्या यात्रेनंतर इतर पक्षांनी यात्रा काढावी वाटली. विरोधकांच्या यात्रांना प्रतिसाद नाही उदयनराजे पक्षात आले तर आनंद, आम्ही त्यांचे स्वागत करु.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Vijay wadettiwar