स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भवाद्यांनी कसली कंबर, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भवाद्यांनीही कंबर कसली आहे. विदर्भ निर्माण महामंचाने विदर्भातील 62 पैकी 40 जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 08:09 PM IST

स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भवाद्यांनी कसली कंबर, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

हर्षल महाजन, (प्रतिनिधी)

नागपूर, 20 ऑगस्ट- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भवाद्यांनीही कंबर कसली आहे. विदर्भ निर्माण महामंचाने विदर्भातील 62 पैकी 40 जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यात विदर्भ निर्माण महामंच निवडणूक लढवणार आहे.

स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असल्याचे विदर्भवाद्यांनी म्हटले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व विदर्भवादी संघटना एकत्र आल्या होत्या. त्यातून विदर्भ निर्माण महामंचाची स्थापना करण्यात आली होती. श्रीहरी आणे यांचा विरा, राजेश काकडे यांचा जनसुराज्य पक्ष, विदर्भ जनआंदोलन समिती, आम आदमी पक्ष (आप) अशा विविध पक्षांचा विदर्भ निर्माण महामंचमध्ये समावेश आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भ निर्माण महामंचाला फारसे यश आले नाही, पण तरीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भनिर्माण महामंच आतापासून तयारीला लागल्याची माहिती विदर्भ निर्माण महामंचचे नेते राजेश काकडे आणि राम नेवले यांनी दिली आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली आमदार भवनात बैठक झाली. यात 40 जागा लढण्याचा निर्णय घेण्यात आला. विदर्भ निर्माण महामंचमध्ये आधी एक डझनहून अधिक पक्ष व संघटनांचा समावेश होता. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर यातील अनेक पक्ष व संघटना बाहेर पडल्या होत्या.

या 11 जिल्ह्यात निवडणूक लढवणार

Loading...

नागपूर जिल्हा- काटोल, सावनेर, रामटेक, कामठी, हिंगणा, उमरेड.

नागपूर शहर- पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर, मध्य नागपूर.

अमरावती जिल्हा- अमरावती, बडनेरा, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट, तिवसा, धामणगाव.

वर्धा जिल्हा- हिंगणघाट, आर्वी, देवळी-पुलगाव, वर्धा.

यवतमाळ जिल्हा- वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ.

अकोला जिल्हा- बाळापूर, आकोट, पूर्व अकोला, मूर्तिजापूर.

वाशीम जिल्हा- रिसोड.

बुलडाणा जिल्हा- खामगाव, चिखली, सिंदखेडराजा.

गडचिरोली जिल्हा- आरमोरी, अहेरी.

चंद्रपूर जिल्हा- राजूरा, वरोरा.

गोंदिया जिल्हा- तिरोडा.

भंडारा जिल्हा- भंडारा व तुमसर.

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2019 03:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...