Live Result Vidarbha : विदर्भाचा भाजपला धक्का आणि काँग्रेस-NCPला 'हात'!

Live Result Vidarbha : विदर्भाचा भाजपला धक्का आणि काँग्रेस-NCPला 'हात'!

कधी काळी काँग्रेसला आणि आता भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत.

  • Share this:

नागपूर 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट झालंय. कधी काळी काँग्रेसला आणि आता भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपची मातृसंस्था असलेलं संघाचं मुख्यालय अशा अनेक गोष्टींमुळे विदर्भातली लढत भाजपसाठी अतीशय प्रतिष्ठेची होती. यावेळी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपने पूर्ण जोर लावला तर काँग्रेस- आघाडीनेही कंबर कसली होती. भाजपच्या जागांच्या एकूण गणितामध्ये विदर्भ भाजपसाठी अतिशय महत्त्वाचं होतं. मात्र 2014 च्या तुलनेत हे निकाल भाजपला धक्का देणारे होते तर काँग्रेसला विदर्भाने हात दिला. रात्री 8 वाजेपर्यंत भाजपची गाडी 31 वर अडखळली. गेल्या वर्षीच्या तुलनेत पक्षाला 15 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला विदर्भाने हात दिलाय. विदर्भातून भाजपचे दोन दिग्गज पराभूत झालेत. वंचितने खाते उघडत एका जागेवर बाजी मारली.

विदर्भ - 2014 परिस्थिती

एकूण जागा - 62

भाजप - 44

शिवसेना - 4

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 1

इतर - 3

Live Updates

अहेरी विधानसभा क्षेत्र 9 वी फेरी भाजपचे राजे आत्राम आघाडीवर : राजे आत्राम भाजप - 22790,  दीपक आत्राम  कांग्रेस - 15049, धर्मराव बाबा आत्राम   राष्ट्रवादी काँग्रेस - 24962

दक्षिण नागपूर दुसऱ्या फेरीत भाजपचे मोहन मते 2588 मतांनी आघाडीवर

पुसदमधून इंद्रनील नाईक 8 हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर

दर्यापूर मतदार संघातुन काँग्रेस चे  बळवंत वानखडे 1959 मताने आघाडीवर

चंद्रपुर..चिमूर विधानसभा क्षेत्रात आठव्या  फेरीत २००० मतांनी  भाजपचे बंटी भांगडीया  आघाडीवर

यवतमाळ जिल्ह्यातील 7  विधानसभा मतदार संघात भाजपा  2, सेना 1, काँग्रेस 3

राष्ट्रवादी-- 1 उमेदवार आघाडीवर आहे।

यवतमाळ- काँग्रेसचे बाळासाहेब मंगुलकर 2098 आघाडीवर

दिग्रस-- शिवसेनेचे संजय 11021  राठोड आघाडीवर

राळेगाव-- भाजपा चे अशोक उईके 1500  आघाडीवर

वणी-- काँग्रेसचे वामन कासावार 2000 आघाडीवर

आर्णी-- काँग्रेसचे शिवाजी मोघे  2034 आघाडीवर

पुसद-- राष्ट्रवादी चे इंद्रनील नाईक 3309 मताने आघाडीवर

उमरखेड--  भाजपचे नामदेव ससाणे 2020 आघाडीवर

हिंगणघाटमध्ये भाजपचे समीर कुणावार 18 हजार 838 मतांनी आघाडीवर

देवळी मतदारसंघ काँग्रेसचे रणजित कांबळे 15700 मतांनी आघाडीवर

वर्धा भाजपचे पंकज भोयर 658 मतांनी मागे, काँग्रेसचे शेखर शेंडे 658 मतांनी पुढे

आर्वी भाजपचे दादाराव केचे 1277 आघाडीवर

वाशिम पाचव्या फेरीत भाजपचे लखन मलिक 2493 आघाडीवर

उमरखेड विधानसभा मतदार - भाजपचे नामदेव ससाने 2806 आघाडीवर आहेत

अकोल पूर्व (13 वी फेरी) मधून भाजपाचे रणधीर सावरकर  15799 मतांनी आघाडीवर

जळगांव जामोद मतदार संघ- नववी फेरी, भाजपचे डॉ संजय कुटे (43737)  आघाडीवर

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना 6649 मतांची आघाडी, भाजपा द्वितीय स्थानी

दर्यापूर मतदार संघातुन काँग्रेस चे  बळवंत वानखडे 809 मताने आघाडीवर

बुलडाणा:- 8 फेरी मिळून ऐकूण, 20349-शिवसेना-संजय गायकवाड, 13703 - काँग्रेस-हर्षवधन सपकाळ, शिवसेना 6646 मतांनी आघाडीवर

वर्धा विधानसभा - काँग्रेस चे शेखर शेंडे -  1,293 मतांनी आघाडीवर

हिंगणघाट विधानसभा - भाजपाचे समीर कुणावार - 10,367 मतांनी आघाडीवर

देवळी विधानसभा - कांग्रेसचे रणजीत कांबळे 12,667  मतांनी आघाडीवर

आर्वी विधानसभा - भाजपाचे दादाराव केचे 1547 मतांनी आघाडीवर

गडचिरोली...अहेरी मतदारसंघात  सातव्या राउंड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे  धर्मराव बाबा 1000 मतांनी आघाडीवर

दक्षिण नागपूर BJP चे मोहन मते 310 मतांनी आघाडीवर

मेहकर चौथ्या फेरीअखेर मेहकर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर संजय रायमुलकर यांना 7672 मतांनी आघाडीवर

चंद्रपूर अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार दोन हजार मतांनी आघाडीवर भाजपचे नाना श्यामकुळे पिछाडीवर

हिंगणघाटमधून भाजपचे समीर कुणावार यांना निर्णायक 11 हजार मतांची आघाडी

अकोला पूर्व तिसरी फेरी - भाजपाचे रणधीर सावरकर 2995 मतांनी आघाडीवर

बुलडाणा चिखली भाजपच्या श्वेताताई महाले (पोस्टल) 1150 मतांनी आघाडीवर

बुलडाणा मलकापूर तिसरी फेरी चैनसुख संचेती...भाजप..247 मतांनी आघाडीवर

यवतमाळ विधानसभा  3100 मतांनी कॉग्रेस उमेदवार बाळासाहेब मांगुळकर आघाडीवर

अचलपूरमधून अपक्ष उमेदवार बच्चू कडू आघाडीवर

बुलढाणा मेहकर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर संजय रायमुलकर यांना 3334 मतांनी आघाडीवर

बल्लापूरमधून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निर्णायक आघाडी

पुसद मधून राष्ट्रवादीचे इंद्रनिल नाईक आघाडीवर

- नागपूर दक्षिण पश्चिममधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर

- बडनेरा मतदार संघात महाआघाडीचे समर्थित युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष उमेदवार रवि राणा 623 मतानी आघाडीवार

- हिंगणघाटमधून भाजपचे समीर कुणावार आघाडीवर

- दर्यापूर मतदार संघातून काँग्रेसचे बळवंत वानखडे 621 मतांनी आघाडीव

-धामणगाव विधानसभा,  पहिल्या फेरीत भाजपचे प्रताप अडसड आघाडीवर - भाजप-प्रताप अडसड - 2981

काँग्रेस-वीरेंद्र जगताप:- 2911, लीड: प्रताप अडसड:- 70 मतांनी आघाड

- मेळघाट मतदार संघातून अपक्ष उमेदवार राजकुमार पटेल आघाडीवर

आरमोरी विधानसभा भाजपा चे कृष्णा गजबे २८५९ मतांनी आघाडी वर

वर्धा विधानसभा - भाजपाचे पंकज भोयर - 700 मतांनी आघाडीवर

हिंगणघाट विधानसभा - भाजपाचे समीर कुणावार - 1300 मतांनी आघाडीवर

देवळी विधानसभा - कांग्रेसचे रणजीत कांबळे 4267 मतांनी आघाडीवर

आर्वी विधानसभा - भाजपाचे दादाराव केचे 500 मतांनी आघाडीवर

विदर्भातल्या लढतीची ही आहेत ठळक वैशिष्ट्य

- राज्याच्या एकूण 288 जागांपैकी 62 जागा विदर्भात आहेत.  भारतातल्या 9 राज्यात असलेल्या एकूण मतदारसंघापेक्षा जास्त जागा फक्त विदर्भात आहे.

- 1985 नंतर राज्यात कुठल्याही एका पक्षाला बहुमताची मॅजिक फिगर असलेला 145 चा आकडा गाठता आलेला नाही.

- 1990 मध्ये काँग्रेस बहुमतापासून फक्त 4 जागा दूर होते.

- 1995 पासून राज्यात युती किंवा आघाडीची  सरकारं यायला सुरुवात झाली.

- 1995 मधलं युती सरकार हे महाराष्ट्रातलं पहिलं बिगर काँग्रेसी सरकार होतं.

- नागपूर ही महाराषट्राची उपराजधानी असलेल्या विदर्भात लोकसभेचे 11 मतदारसंघ आहेत.

- विदर्भाने महाराष्ट्राला मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस असे चार मुख्यमंत्री दिले.

- विदर्भातल्या पुसद या मतदार संघातून वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री राज्याला मिळाले.

- मुख्यमंत्र्याशिवाय महाराष्ट्र सरकारमधले सुधीर मुनगंटीवार, मदन येरावार, परिणय फुके हे मंत्री यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

- अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचे पती रवी राणा अपक्ष म्हणून बडनेरा मतदारसंघातून लढत आहेत.

- विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा असून त्यासाठी 739 उमेदवार रिंगणात आहेत.

- लोकसभा निवडणुकीत 50 विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेनं आघाडी घेतली होती.

21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. या वेळी भाजप- शिवसेना-आरपीय महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा सरळ लढा होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही 101 जागा लढवत काही मतदारसंघात चुरशीची स्पर्धा निर्माण केली. वंचित बहुजन आघाडीमधून आणि MIM यांची फारकत झाल्याने एकत्रित परिणाम कमी झाला. तरी वंचित फॅक्टर मराठवाड्यात कमाल करतो का याची उत्सुकता आहे. प्रचारादरम्यान भाजप, शिवसेनेला खरी लढत दिली शरद पवार यांनी. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे सभांना गर्दी खेचली तरी त्याचा परिणाम मतपेटीवर किती झाला हे कळेलच.

2014 ची विधानसभेची परिस्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 08:07 AM IST

ताज्या बातम्या