Live Result Vidarbha : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधून आघाडीवर

मुख्यमंत्र्यांविरुद्ध आघाडीने आशीष देशमुख यांना मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध मैदानात उतरवलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 08:29 AM IST

Live Result Vidarbha : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधून आघाडीवर

नागपूर 24 ऑक्टोंबर :  सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीलाच आघाडी घेतलीय. 2014च्या निवडणुकीतली फडणवीस विक्रमी मतांनी विजयी झाले होते. मुख्यमंत्र्यांविरुद्ध आघाडीने आशीष देशमुख यांना मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध मैदानात उतरवलं होतं. राज्याच्या एकूण 288 जागांपैकी 62 जागा विदर्भात आहेत.  भारतातल्या 9 राज्यात असलेल्या एकूण मतदारसंघापेक्षा जास्त जागा फक्त विदर्भात आहे.

21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. या वेळी भाजप- शिवसेना-आरपीय महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा सरळ लढा होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही 101 जागा लढवत काही मतदारसंघात चुरशीची स्पर्धा निर्माण केली. वंचित बहुजन आघाडीमधून आणि MIM यांची फारकत झाल्याने एकत्रित परिणाम कमी झाला. तरी वंचित फॅक्टर मराठवाड्यात कमाल करतो का याची उत्सुकता आहे. प्रचारादरम्यान भाजप, शिवसेनेला खरी लढत दिली शरद पवार यांनी. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे सभांना गर्दी खेचली तरी त्याचा परिणाम मतपेटीवर किती झाला हे कळेलच.

विदर्भ - 2014 परिस्थिती

एकूण जागा - 62

भाजप - 44

Loading...

शिवसेना - 4

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 1

इतर - 3

2014 ची विधानसभेची परिस्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

- राज्याच्या एकूण 288 जागांपैकी 62 जागा विदर्भात आहेत.  भारतातल्या 9 राज्यात असलेल्या एकूण मतदारसंघापेक्षा जास्त जागा फक्त विदर्भात आहे.

- 1985 नंतर राज्यात कुठल्याही एका पक्षाला बहुमताची मॅजिक फिगर असलेला 145 चा आकडा गाठता आलेला नाही.

- 1990 मध्ये काँग्रेस बहुमतापासून फक्त 4 जागा दूर होते.

- 1995 पासून राज्यात युती किंवा आघाडीची  सरकारं यायला सुरुवात झाली.

- 1995 मधलं युती सरकार हे महाराष्ट्रातलं पहिलं बिगर काँग्रेसी सरकार होतं.

- नागपूर ही महाराषट्राची उपराजधानी असलेल्या विदर्भात लोकसभेचे 11 मतदारसंघ आहेत.

- विदर्भाने महाराष्ट्राला मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस असे चार मुख्यमंत्री दिले.

- विदर्भातल्या पुसद या मतदार संघातून वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री राज्याला मिळाले.

- मुख्यमंत्र्याशिवाय महाराष्ट्र सरकारमधले सुधीर मुनगंटीवार, मदन येरावार, परिणय फुके हे मंत्री यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

- अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचे पती रवी राणा अपक्ष म्हणून बडनेरा मतदारसंघातून लढत आहेत.

- विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा असून त्यासाठी 739 उमेदवार रिंगणात आहेत.

- लोकसभा निवडणुकीत 50 विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेनं आघाडी घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 08:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...