Home /News /maharashtra /

पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 2 मित्रांचा बुडून मृत्यू, भंडारा जिल्ह्यातील घटना

पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 2 मित्रांचा बुडून मृत्यू, भंडारा जिल्ह्यातील घटना

अनेकदा तरुण उत्साहाच्या भरात भान हरवतात आणि जीवाला मुकतात.

    प्रविण तांडेकर, भंडारा, 3 सप्टेंबर : पावसाळ्यात विविध ठिकाणी मित्रांसोबत जात निसर्गाचा आनंद लुटण्याचा मोह अनेकांना होतो. मात्र अनेकदा अशा ठिकाणांवर गेल्यावर तरुण उत्साहाच्या भरात भान हरवतात आणि जीवाला मुकतात. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातीलही अशीच एक घटना घडली आहे. शिवनीबांध तलावामध्ये बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. नितेश धनिराम सूर्यवंशी वय 20 रा. सौंदळ, गोंदिया जिल्हा आणि अमर शामराव कुंभरे वय 20 रा. श्रीरामनगर, गोंदिया असं मृतकांचं नाव आहेत. या दोघांचे मृतदेह स्थानिक लोकांच्या मदतीने तलावातून बाहेर काढण्यात आलेला आहेत. शिवनीबांध हे दहा वर्षानंतर तुडुंब भरून वाहत असल्यामुळे पर्यटनासाठी नागरिक या तलावावर येत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील हे दोन्ही तरुण आयटीआयचे शिक्षण घेत होते. तलाव तुडुंब भरून वाहत असल्याने पर्यटनासाठी हे तिथे आले होते. आल्यानंतर या दोन्ही तरुणांना पाण्यात पोहण्याचा मोह काही आवरता आला नाही. मात्र तलावातील पाण्याचा अंदाजही त्यांना आला नाही आणि त्यामुळे पोहायला उतरलेल्या या दोन्ही तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हे तरुण पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी त्यांना पाण्याबाहेर .काढले मात्र तोपर्यंत या दोघांचीही जीव गेला होता. तलाव तुडुंब भरून असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने कोणतीही यंत्रणा लावली नसल्याने ही दुःखद घटना घडली आहे. दरम्यान, गणपती विसर्जनाच्या काळातही महाराष्ट्रात तरुण पाण्यात बुडाल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे तरुणांनी पोहण्यासाठी जलाशयात गेल्यावर काळजी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Vidarbha

    पुढील बातम्या