ZP Election Result: वाशिममध्ये राष्ट्रवादीचे 'टिक टिक' तर अकोल्यात वंचित यशस्वी

ZP Election Result: वाशिममध्ये राष्ट्रवादीचे 'टिक टिक' तर अकोल्यात वंचित यशस्वी

अकोल्यात वंचित आघाडीवर असून वाशीममध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.

  • Share this:

किशोर गोमाशे/कुंदन जाधव,(प्रतिनिधी)

वाशिम/अकोला, 08 जानेवारी : जिल्ह्याची मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी मंगळवारी मतदान झालं तर बुधवारी सकाळी 10 वाजता पासून मतमोजणी सुरू झाली. यामध्ये सर्वाधिक 10 जागा जिंकत राष्ट्रवादी एक नंबर पक्ष ठरला आहे. मात्र यामध्ये अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला आहे. वाशिमचे विद्यमान आमदार लखन मलिक यांच्या मुलाचा नितेश मलिक यांचा वारला सर्कलमधून पराभव झाला असून वंचितचे जिल्हा अध्यक्ष दिलीप जाधव यांचा राजुरा सर्कल मधून पराभव झाला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या पत्नी यांचा वारा सर्कलमधून पराभव झाला आहे. त्यामुळे कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने जिल्ह्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

निवडून आलेले संख्याबळ पक्षाचं संख्याबळ:

राष्ट्रवादी काँग्रेस 10

वंचित बहुजन आघाडी 09

काँग्रेस 09

भाजप 07

शिवसेना 07

जिल्हा जनविकास आघाडी 07

स्वाभिमानी शेतकरी 01

अकोल्यात वंचित फॅक्टर यशस्वी

अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. आताची आकडेवारी पाहता अकोला जिल्हा परिषदवर पुन्हा भारिप बहुजन महासंघ म्हणजेच वंचित बहुजन आघाडीची सत्ता येण्याचे चिन्ह दिसतायेत, अकोला जिल्हा परिषद मध्ये 53 जागांसाठी निवडणूक लढवली गेली होती. त्यातील 43 जागांचा निकाल लागला असून, यातील 20 जागावर भरीपने बाजी मारली आहे. सध्या अकोल्यातील बार्शी टाकळी,बाळापूर आणि तेल्हारा तालुक्यातील पूर्ण निकाल येणे शिल्लक आहे. संपूर्ण निकाल हाती आल्यावरच सत्ता कुणाची येईल, हे कळू शकेल.

राज्यात आज जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची मतममोजणी सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर असलेल्या या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी मतदान झाले असून यामध्ये आतापर्यंत 40 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यानुसार वंचितला 7, भाजपला 7, शिवसेनेला 5, काँग्रेसला 7, राष्ट्रवादीला 5  तर इतर पक्षांना 10 जागांवर विजय मिळाला आहे.

वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने एकत्र यावं यासाठी पक्षांचे नेते आग्रही होते मात्र तसे होऊ शकले नाही. त्यामुळे याठिकाणी विशिम जिल्हा जनविकास आघाडी स्थापन करून काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी वाशिममध्ये वंचितसोबत आघाडी केली. भाजपनेही इतर कोणाशी युती केली नाही. या ठिकाणी काँग्रेसच्या अनंतराव देशमुख, भाजप आमदार राजेंद्र पाटणी, राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Osmanabad ZP Election Result: शिवसेनेच्या 'तानाजीं'ची बंडखोरी, भाजपला दिली साथ

अकोला जिल्हा परिषदेवर गेल्या 15 वर्षांपासून भारिपचे वर्चस्व आहे. सध्या वचिंत आघाडीच्या बॅनरखाली भारिपने निवडणूक लढवली आहे. त्याचबरोबर आता महाविकास आघाडी स्थापन झाल्यानं जिल्ह्यातील चित्र वेगळं दिसण्याची शक्यता आहे.

Dhule ZP Election Result: भाजपची मुसंडी, काँग्रेससह राष्ट्रवादीचा धुव्वा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2020 02:40 PM IST

ताज्या बातम्या