Home /News /maharashtra /

पोहण्याचा मोह आवरला नाही म्हणून दोघांनी टाकल्या उड्या, अखेर क्षणात गेला जीव

पोहण्याचा मोह आवरला नाही म्हणून दोघांनी टाकल्या उड्या, अखेर क्षणात गेला जीव

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    नागपूर, 03 सप्टेंबर : नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यात दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. शाळेला सुट्टी असल्यामुळे ही दोघंजण शेजारच्या जंगलामध्ये गुरं चरण्यासाठी गेले होते. अशात मस्ती करताना दोघेही तलावात उतरले आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. VIDEO पाहून तुम्हीच म्हणाल कोरोनाचा धोका वाढला, हजारोंनी काढली मिरवणूक आणि.... भोजराज चनाने आणि मोनू घाटवडे अशी मृत्यु झालेल्या मुलांची नाव आहेत. सध्या शाळेला सुट्टी असल्यानं गावाशेजारी असलेल्या जंगलात हे दोघेही गुरं चारण्यासाठी गेले होते. याच जंगलात मच्छी तलाव आहे. या तलावात पोहण्याचा मोह न आवरल्यानं दोघेही तलावात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यानं खोल पाण्यात गेल्यानं दोघांचाही बुडून मृत्यु झाला. सायंकाळ उलटून गेली तरीही दोघे घरी गेले नाहीत. यानंतर कुटुंबियांकडून शोधाशध सुरू झाली. यावेळी दोघांची सायकल तलावाशेजारी आढळून आली. त्यामुळं तलावात शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह आढळले. ही सगळी घटना पाहता कुटुंबियांना मोठा धक्का बसला तर गावावर शोककळा पसरली आहे. लॉकडाऊनमध्ये पहिली पिकनिक ठरली अखेरची, मेळघाटात 3 तरुणांचा जागीच मृत्यू घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना प्राचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या