नागपुरात शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळला, पुरुष रुग्णासह महिलेचा दबून मृत्यू

नागपुरात शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळला, पुरुष रुग्णासह महिलेचा दबून मृत्यू

देवराव बागडे हे आजारी होते आणि या रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले होते.

  • Share this:

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर, 12 डिसेंबर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून एका रुग्णासह महिलेचा दबून मृत्यू झाला आहे. तर एका महिला गंभीर जखमी आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. देवराव बागडे (वय-66) आणि वनिता वाघमारे (वय-39) अशी मृतांची नावे आहेत. देवनाथ हे सावनेर येथील तर वनिता या शहरातील भांडेवाडी परिसरातल्या रहिवासी होत्या.

मिळालेली माहिती अशी की, शासकीय रुग्णालयातील चर्मरोग बाह्यरुग्ण विभागाचा गुरूवारी स्लॅब कोसळला. याखाली दबून एका रुग्णाचा मृत्यू झाला. देवनाथ बागडे असे मृत रुग्णाचे नाव आहे.

नागपूरच्या चर्मरोग बाह्यरुग्ण विभागात नातेवाईकाला बघायला आलेल्या वनिता वाघमारे आणि रुग्ण देवराव बागडे याच्या अंगावर सज्जा पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी आहे. देवराव बागडे हे आजारी होते आणि या रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले होते. त्यांना भेटायला दोन महिला नातेवाईक आल्या होत्या. त्यावेळी ते या सज्जा खाली बसले असताना सज्जा त्यांच्या अंगावर पडला. तेव्हा देवराव यांचा जागीच मृत्यू झाला. त्या तिघांनाही अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त बी.जी. गायकर यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: vidarbha
First Published: Dec 12, 2019 07:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading