'मॅन ऑफ द मॅच' ठरलेल्या क्रिकेटपटूवर काळाची झडप, अपघातात दोघे जागेवरच ठार

'मॅन ऑफ द मॅच' ठरलेल्या क्रिकेटपटूवर काळाची झडप, अपघातात दोघे जागेवरच ठार

क्रिकेट सामना खेळून परत जाणाऱ्या दोन क्रिकेटपटूंवर काळाची झडप घातली. रस्ते अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

  • Share this:

भास्कर मेहेरे,(प्रतिनिधी)

यवतमाळ,29 डिसेंबर: क्रिकेट सामना खेळून परत जाणाऱ्या दोन क्रिकेटपटूंवर काळाची झडप घातली. रस्ते अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. चापडोह पुनर्वसनजवळ नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर शनिवारी हा अपघात झाला. जयेश प्रवीण लोहिया (वय-10, रा.रामनगर वर्धा) अक्षद अभिषेक वैद (वय-11, रा.वर्धा) असे मृतांचे नावे आहे. ब्रदर हूड क्रिकेट क्लब, वर्धाचे हे क्रिकेटपटू होते.

मिळालेली माहिती अशी की, पद्मविलास क्रिकेट क्लबने यवतमाळ शहरातील गोधणी मार्गावर टी-20 सामन्यांचे आयोजन केले होते. शनिवारचा सामना झाल्यानंतर वर्धेतील क्रिकेट क्लबचे क्रिकेटपटू कारने (एमएच-32 एएच 3777) पालकांसोबत वर्ध्याकडे निघाले होते. दरम्यान, नागपूर तुळजापूर राज्य महामार्गावर चापडोह पुनर्वसनजवळ त्यांचे वाहन दुभाजकावर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की, वाहनातील दोन क्रिकेटपटूंचा जागेवरच मृत्यू झाला. इतर क्रिकेटपटूंसह त्यांचे पालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले केले. दर्श सुमित आचलीया (वय-11) व रोमित अजय गलांडे (वय-11) तसेच मृत जयेशचे वडील प्रवीण मोहन लोहिया (वय-40)आणि अतुल प्रकाश केळकर (वय-40) हे चौघे जण अपघातात गंभीर जखमी झाले आहे. प्रवीण लोहिया हे वाहन चालवत होते. सगळे सामना खेळून परत निघाले होते.

जयेश ठरला होता 'मॅन ऑफ द मॅच'

मृत जयेश 'मॅन ऑफ द मॅच' ठरला होता. त्याने 6 बळी घेऊन आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर गोधणी मार्गातून घाटंजी बायपास येथून नागपूरकडे जात असताना चापडोह गावाजवळ हा भीषण अपघात झाला. अपघात होताच स्ठानिक गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेऊन जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2019 09:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading