भंडारा, 17 जुलै : भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्ड इथं दुपारच्या सुमारास दोन मुलांनी वडिलांची रोड वरच चाकूने वार करत हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. यात वडील अरुण गुडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये भर रस्त्यात हत्येच्या प्रयत्नाचा थरार घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी अरुण हे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे होते. त्यांची पत्नी दोन मुलांसह वॉर्डातील दुसऱ्या भागात भाड्याने राहत होती. अरुण हे नेहमी त्यांच्या पत्नीला मारहाण करायचे. आज घटनेच्या दिवशी अरुण हे त्यांच्या पत्नीच्या घरी दुपारी 3.30 वाजता भेटण्यासाठी गेले होते. मात्र, ते दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांनी सोबत हत्यारंदेखील आणलं होतं अशी माहिती प्रत्यदर्शीकडून देण्यात आली आहे. या दरम्यान पत्नी आणि अरुण यांचं कडाक्याचं भांडण झालं.
महाराष्ट्रात या जिल्ह्याने जाहीर केला कडकडीत लॉकडाऊन, 7 दिवस सर्व सेवा बंद
1 कोटी जिंकण्याची मोठी संधी! TikTok बंदीनंतर या कंपनीने सुरू केला भन्नाट शो
वाद झाला तेव्हा दोन्ही मुलं घरी होती. आई-वडिलांची भांडणं पाहून दोन्ही मुलांना राग आला आणि त्यांनी घरातून चाकू घेत वडिलांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. चाकूने खोलवर वार झाल्यामुळे अरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
येत्या 3 दिवसात या भागांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
दरम्यान, आरोपी मुलांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.