झोमॅटोचे 'टी शर्ट' आणि 'बॅग' वापरून केली घरफोडी, 'यू ट्यूब'वरून घेतला गुरुमंत्र!

झोमॅटोचे 'टी शर्ट' आणि 'बॅग' वापरून केली घरफोडी, 'यू ट्यूब'वरून घेतला गुरुमंत्र!

पोलिसांनी या दोघांना चोरीचे तंत्र कुठे शिकले, झोमॅटोचा टी शर्ट, बॅग वापरण्याची कल्पना कुणी शिकवली, अशी विचारणा केली. त्यावर शुभमने दिलेली माहिती पोलिसांना चाट पाडणारी ठरली.

  • Share this:

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर, 18 सप्टेंबर: झोमॅटोचे 'टी शर्ट' घालून आणि 'बॅग'चा वापर करून रात्रीच्या वेळी कुलूपबंद घरात चोऱ्या करणाऱ्या मध्य प्रदेशच्या बालाघाटमधील दोन चोरट्यांना गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, दागिने आणि अन्य वस्तूसह एक लाख आठ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.शुभम कमल डहरवाल (वय-19) आणि सचिन नत्थुमल डहरवाल (वय-18) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

शुभम हा बालाघाट जिल्ह्यातील बमनी येथील तर सचिन रामपायली येथील रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी ते नागपुरात आले. त्यांनी गिट्टीखदानमध्ये जगदीशनगरात भाड्याने खोली घेतली. रात्रीच्या वेळी ते झोमॅटोचे टी शर्ट घालून आणि फूड डिलिव्हरीची बॅग घेऊन घराबाहेर पडायचे. वेगवेगळ्या भागात पाहणी करून ते बाहेरून कुलूप लावलेले घर शोधायचे. घराच्या दाराचे कुलूप तोडून आतमधील मुद्देमाल घेऊन ते साळसूदपणे आपल्या रूमवर परत येत होते. आकार नगरात शुभदा प्रशांत खांडेकर (वय- 55) यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या दोन्ही मुली पुण्यात शिकतात. त्यामुळे त्या घराच्या दाराला कुलूप लावून महिनाभरापासून आपल्या माहेरच्यांकडे राहायला गेल्या होत्या. 14 सप्टेंबरला सकाळी त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना फोन करून दाराचे कुलूप तुटले असल्याची माहिती दिली. त्यावरून त्या घरी आल्या. चोरट्यांनी चांदीची भांडी, दागिने आणि बेन्टेक्स ज्वेलरी लंपास केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. चौकशीदरम्यान पहाटे 2 ते 3 च्या सुमारास झोमॅटोचे टी शर्ट घातलेले दोन युवक खांडेकर यांच्या घराजवळ आले होते, अशी माहिती दिली होती. दरम्यान, गिट्टीखदान पोलीस नाकेबंदी करून गुन्हेगारांची तपासणी करीत असताना मोटरसायकलवर झोमॅटोचा टी शर्ट घालून शुभम आणि सचिन येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांच्या बॅगची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर बेन्टेक्सचे दागिने आणि चांदीची भांडी आढळली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन त्यांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी खांडेकर यांच्यासह आणखी एका घरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले दागिने आणि चोरीसाठी वापरलेल्या दुचाकीसह एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

'यू ट्यूब'वरून घेतला गुरुमंत्र!

पोलिसांनी या दोघांना चोरीचे तंत्र कुठे शिकले, झोमॅटोचा टी शर्ट, बॅग वापरण्याची कल्पना कुणी शिकवली, अशी विचारणा केली. त्यावर शुभमने दिलेली माहिती पोलिसांना चाट पाडणारी ठरली. 'यू ट्यूब'वर घरफोडीचे गुन्हे पाहताना हे तंत्र आत्मसात केल्याचे शुभमने सांगितले.

Loading...

अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2019 03:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...