राजकीय वारसा नसताना निवडणुकीच्या रिंगणात उतरले भाऊ - बहिण, ग्रामपंचायत घेतली ताब्यात

राजकीय वारसा नसताना निवडणुकीच्या रिंगणात उतरले भाऊ - बहिण, ग्रामपंचायत घेतली ताब्यात

अकोल्याच्या आपोती येथील रहिवासी असणाऱ्या इंजिनिअरिंगच्या तरूणाने थेट ग्रामपंचायत (Grampanchayat Election) ताब्यात घेतली आहे. वैभव देविदास तराळे असं या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

  • Share this:

अकोला 13 फेब्रुवारी : कोरोनामुळं (Corona) करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे (Lockdown) अनेकांच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम झाले. मात्र, काही व्यक्ती अशाही आहेत, ज्यांच्या जीवनात या लॉकडाऊननं एक नवं वळण आणलं. अशीच कथा आहे अकोल्याच्या आपोती येथील रहिवासी असणाऱ्या इंजिनिअरिंगच्या तरूणाची. लॉकडाऊनमुळं गावाकडे आलेल्या या तरूणानं आता थेट ग्रामपंचायत (Grampanchayat Election) ताब्यात घेतली आहे. वैभव देविदास तराळे असं या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

विशेष म्हणजे घरात काहीही राजकीय वारसा नसताना या तरुणानं स्वतःच पॅनल तयार केला. लॉकडाऊनच्या काळात गेल्या काही महिन्यांपासून गावीच राहाण्याचा योग आला. याच काळात ओळखी वाढल्या. या ओळखींचा फायदा तरुणाला थेट गावकारभारी होण्यासाठी झाला. इतकंच नाही तर वैभवसोबतच इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेली त्याची बहिण पुजा तराळे हीदेखील या निवडणुकीत निवडून आली आहे. त्यामुळे, दोघंही बहिण भाऊ आता गावाच्या ग्रामपंचायतीची धुरा सांभाळणार आहेत.

वैभवला महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच राजकारणाची आवड निर्माण झाली. पुढे लॉकडाऊनदरम्यान त्यानं गावातील काही तरूणांना सोबत घेत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी स्वतःचा एक अपक्ष पॅनल उभा केला. वैभवचे वडील हे परिवहन महामंडळात वाहकाची नोकरी करतात तर आई गृहिणी आहे. अशा परिस्थितीत कोणताही राजकीय वारसा नसताना ही खिंड लढवणं वैभवसाठी सोपं नक्कीच नव्हतं. मात्र, जिद्द असेल तर मार्ग सापडतोच, हे त्यानं खरं करून दाखवलं.

निवडणुकीचा निकाल समोर आला तेव्हा वैभवचा आनंद गगनात मावेना झाला. कारण, मोठ्या आणि राजकीय आधार असणाऱ्या पक्षांना मागे टाकतं वैभवनं आपल्या पॅनलमधील 7 पैकी 5 जागा निवडून आणल्या. वैभवनं याआधीही कॉलेज अध्यक्षाचं पद सांभाळलं आहे. तसंच विद्यापीठ प्रतिनिधी असलेला वैभव विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर विद्यापीठ चळवळीतही सक्रीय होता.

Published by: Kiran Pharate
First published: February 13, 2021, 12:59 PM IST

ताज्या बातम्या