Home /News /maharashtra /

तुकाराम मुंढेंचा आदेश मोडीत, राज्य सरकारने दिला नागपूरकारांना मोठा दिलासा

तुकाराम मुंढेंचा आदेश मोडीत, राज्य सरकारने दिला नागपूरकारांना मोठा दिलासा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. परंतु, पालिकेच्या या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला होता.

    नागपूर, 23 ऑगस्ट : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. परंतु, पालिकेच्या या निर्णयाला व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. अखेर राज्य सरकारने नवीन सूचना केल्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढेंचा आदेश मोडीत निघाला आहे. नागपुरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता नागपूर शहरातील दुकानदार आणि त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या नोकरांना कोरोना चाचणी करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने दिले होते. या आदेशाला व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. एवढंच नाहीतर व्यापाऱ्यांनी एक बैठकही घेतली होती. महाराष्ट्रातील दुर्मीळ योग, 'या' स्मशानभूमीत आहे बाप्पा विराजमान, पाहा हे PHOTOS मात्र, प्रवास करणाऱ्या किंवा जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्ती आणि व्यापाऱ्यांना कोविड-19 ची लक्षणे नसल्यास कोविड टेस्टची गरज नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.  प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी याबाबत तसे परिपत्रक काढले आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने कोविड-19 टेस्टसाठी आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून लॉकडाउन असल्यामुळे आता अनलॉकची घोषणा करत एक व्यवसाय हळूहळू सुरू केले जात आहे. राज्याअंतर्गत एसटी बस सेवाही सुरू झाली आहे. त्याचबरोबर बाजारपेठाही खुल्या करण्यात आल्या आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सरसकट कोरोनाची चाचणी घेतली जात होती. पण, आता जर एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तरच त्याची चाचणी करण्यात यावी अशी सूचना राज्य सरकारने काढली आहे. व्यापारी, प्रवासी व्यक्तींमध्ये जर कोरोनाची लक्षणे आढळत नसतील तर त्यांची कोरोनाची चाणी करण्याची आवश्यकता नाही, असे राज्य सरकारने नव्याने दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे. सराईत गुन्हेगार मित्र द्यायचा त्रास, ओंकारने घरामागेच खोदला खड्डा अन्.... याआधी कोरोनाची चाचणी ही स्वॅब घेऊन केली जात होती. त्यामुळे या चाचणीचा अहवाल हा 24 तासानंतर मिळतो. या चाचणीसाठी सुमारे अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागत आहे. तर दुसरीकडे आता अँटिजन चाचणी केली जात आहे. यात पाचशे रुपयांमध्ये अवघ्या 20 मिनिटांमध्ये रिपोर्ट प्राप्त होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची लगेच ओळख पटत आहे. त्यामुळे संशयितांना क्वारंटाइन करण्यात येत आहे तर कोरोनाबाधितांना तातडीने कोविड सेंटरमध्ये हलवण्यात येत आहे. पण, तरीही राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यासमोर नवे संकट, ग्रामीण भागातून आली धक्कादायक माहिती समोर केंद्र सरकारनेही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या कराव्यात असे आदेश दिले होते. त्यानंतर आता राज्य सरकारनेही नवीन मार्गदर्शन सूचना जारी केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: तुकाराम मुंढे

    पुढील बातम्या