अज्ञात वाहनाने वाहतूक पोलिसांला चिरडले, एक जागीच ठार तर दुसरा गंभीर

अज्ञात वाहनाने वाहतूक पोलिसांला चिरडले, एक जागीच ठार तर दुसरा गंभीर

नागपूर-जबलपूर महामार्गवर अज्ञात वाहनाने वाहतूक पोलिसांना चिरडले.

  • Share this:

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर,12 जानेवारी:नागपूर-जबलपूर महामार्गवर अज्ञात वाहनाने वाहतूक पोलिसांना चिरडले. एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मरारवाडी गावाजवळ रविवारी सकाळी हा अपघात झाला. महामार्गावर बोलेरो आणि कारमध्ये भीषण अपघात झाला होता. यावेळी कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रस्ता ओलांडताना पोलिसांना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागेवर मृत्यू झाला. जखमी पोलिस कर्मचाऱ्याला उपचारासाठी हॉस्पिटसमध्ये हलवण्यात आले आहे. त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरवर्षी दीड लाख लोक गमवतात प्राण..

भारतात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. यात दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. ही धक्कादायक आकडेवारी आहे. समाधानाची बाब म्हणजे, तामिळनाडूमध्ये अपघाताचे प्रमाण 29 टक्क्यांने तर मृत्यूचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी झाले आहेत. यामुळे रस्ता अपघात कमी करणाऱ्या या तामिळनाडू पॅटर्नचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सुक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

जिल्हा सुरक्षा समिती, प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस नागपूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 व्या रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला. याच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मंचावर पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महामार्ग पोलीस अधीक्षक संजय शित्रे आदी उपस्थित होते.

संजय शित्रे म्हणाले, एकूण अपघातांमध्ये सर्वाधिक अपघात दुचाकीचे होतात. यात हेल्मेट न घालणे, रॅश ड्रायव्हिंग, गतीवर नियंत्रण नसणे व वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे हे मुख्य कारण आहेत. यामुळे प्रत्येक वाहन चालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2020 01:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading