चंद्रपूरच्या जंगलातल्या वाघांना हलवणार; स्थलांतरामागे हे आहे कारण

चंद्रपूरच्या जंगलातल्या वाघांना हलवणार; स्थलांतरामागे हे आहे कारण

माणसांवर स्थलांतराची वेळ येते हे माहिती आहे, आता प्राण्यांचंही स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन मंत्रालयाने नवीन धोरण आखून चक्क वाघांचं स्थलांतर करण्याचं ठरवलं आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे  : उद्योगधंद्याच्या शोधात शहराकडे होणारं आणि आता COVID-19 च्या प्रभावाने उलट दिशेनं चाललेलं स्थलांतर आपल्या परिचयाचं आहे. पण आता प्राण्यांचंही स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन मंत्रालयाने नवीन धोरण आखून चक्क वाघांचं स्थलांतर करम्याचं ठरवलं आहे. चंद्रपूरच्या जंगलातले वाघ अन्य जिल्ह्यांमध्ये हलवण्याचा सरकारचा नवा प्लॅन आहे.

वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील वन्यजीव - मानव संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवीन धोरण आणणार आहे. यासंदर्भात एक बैठक घेण्यात आली. वाघांना वाचवणं आणि मानव- वाघ यांचा संघर्ष कमी करणं या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यातील 50 वाघांचं इतर जिल्ह्यातील जंगलात स्थानांतरण कशा प्रकारे करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली.

1 जानेवारी ते 20 मे 2020 या कालावधीत  राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघांच्या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला तर एका अन्य वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा अशा एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी माणसांनी केलेल्या हल्ल्यामध्ये किंवा इलेक्ट्रिक तारेचा स्पर्श झाल्यामुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वन्यजीव -  मानव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचं राठोड यांनी सांगितलं.

VIDEO: सगळ्यात विषारी कोब्रा नागाला वनाधिकाऱ्याने पाजलं पाणी आणि....

राज्यात एकूण 312 वाघ आहेत. त्यापैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 160 वाघांचे अस्तित्व आहे.चंद्रपूर शहरापासून केवळ पाच किलोमीटरच्या परिघामध्ये 21 वाघांचा संचार आहे.त्यामुळे याठिकाणी वन्यजीव-  मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात दिसून येतो.त्यातच येत्या वर्षभरात या परिसरात आणखी 60 नवीन वाघाच्या बछड्यांची भर पडणारआहे.त्यावर उपाय म्हणून या 50 वाघांना ज्या जंगलात सोडणार येणार आहे

वाघ सोडण्याआधी जिथे ते जातील तिथे त्यांना पुरेसं भक्ष्य उपलब्ध आहे ना हे पाहावं लागणार आहे. त्या दृष्टीने त्या जंगलामध्ये सर्वप्रथम तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवावी लागेल याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

वन्यजीव - मानव संघर्ष कमी करणे आणि वाघांच्या स्थानांतरण संदर्भात राज्य वन्यजीव मंडळासमोर लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि  धोरण निश्चित करण्यात येईल अशी माहितीही वनमंत्र्यांनी यावेळी दिली.

अन्य बातम्या

अरेरे…काही लाज? ते चोरत होते कोरोना पीडितांच्या मृतदेहांवरचे दागिने

1 जूनपासून सुरू होणार सुरू होणार एक्स्प्रेस ट्रेन; रेल्वेकडून महत्त्वाची माहिती

First published: May 23, 2020, 7:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading