घराची भिंत कोसळली.. 8 महिन्यांच्या गरोदर महिलेसह कुटुंबातील तिघांचा मृत्यू

घराची भिंत कोसळली.. 8 महिन्यांच्या गरोदर महिलेसह कुटुंबातील तिघांचा मृत्यू

घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांत गरोदर महिलेसह 6 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

  • Share this:

अमोल गावंडे,(प्रतिनिधी)

बुलडाणा, 20 सप्टेंबर: घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांत गरोदर महिलेसह 6 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेत इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मेहकर शहरातील इमामवाडा परिसरात राहणारे शेख कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक घराशेजारील घराची भिंत कोसळलीय. ढिगाऱ्या खाली दबून शेख कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर झाले आहेत. जखमीवर मेहकरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरु असताना ही घटना घडली.

बुलडाणा जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती,नंतर रात्रीपासून जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तेव्हा जिल्ह्यातील मेहेकर येथील इमामवाडा चौकात राहणारे शेख कुटुंब गाढ झोपेत असताना मातीची भिंत शेख कुटुंबावर कोसळली. कुटुंबातील पाच जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. भिंत कोसळताना मोठा आवाज झाल्याने शेजाऱ्यांनी आरडाओरड केली आणि मदतीला सुरुवात केली. पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मातीखाली दबलेल्या पाचही जणाना बाहेर काढले. सगळ्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यापैकी तिघांना डॉंक्टरांनी मृत घोषित केले. दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहे.

मृत महिला होती 8 महिन्यांची गरोदर..

या दुर्घटनेत पती, पत्नीसह 6 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला आठ महिन्यांची गरोदर होती. शेख असिफ शेख अशरफ (वय-28), शाहिस्ता बी शेख असिफ (वय-25) आणि जुनेद शेख असिफ (वय-6) अशी मृतांची नावे आहेत. शेख तहेर शेख अशरफ (वय-20) आणि  सुजान शेख असिफ (वय-8) हे दोघे गंभीर जखमी आहेत.

108 ॲम्बुलन्स न आल्याने नागरिकांत संताप..

घटनास्थळाहून काही सुज्ञ नागरिकांनी 108 नंबर डायल करून ॲम्बुलन्स बोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमच्याकडे गाडी उपलब्ध नाही, जी गाडी आहे ती नादुरुस्त आहे. गाडीवर ड्रायव्हर नाही. गाडीवर डॉक्टर नाही, अशी उत्तरे मिळाले. अखेर जखमींना खासगी वाहनांतून रुग्णालयात हलवण्यात आले. आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांत संतप्त व्यक्त केला जात आहे.

काँग्रेस की भाजप? आजोबांनी कानात सांगितलं गुपित, पाहा VIDEO

First published: September 20, 2019, 3:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading