अकोला, 10 डिसेंबर: मॉर्निंग वॉकला गेलेल्या चौघांना 407 टेम्पोनं चिरडल्याची घटना अकोट-अंजनगाव मार्गावर गुरुवारी (10 डिसेंबर) पहाटे घडली. या घटनेत तिघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समजते. अपघात इतका भीषण होता की, टेम्पो देखील रस्त्याच्या कडेला उलटला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शालिग्राम उत्तमराव राऊत (वय- 60), उत्तमराव किसनराव नाठे (वय-60) व गजानन नेमाडे (वय-55) अशी मृतांची नावं आहेत.
हेही वाचा..रावसाहेब दानवे यांचा DNA तपासावा लागेल, बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
मिळालेली माहिती अशी की, अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील अकोट अंजनगाव मार्गावरील परिसरात नागरिक हे पहाटे फिरायला जात असतात. हा रस्ता राज्य महामार्ग असला तरी हा रस्ता पादचाऱ्यांसाठी फिरायला सुरक्षित आहे. टेम्पो (एमएच 20 डीई 7433) हा भरधाव आला आणि त्याने पादचाऱ्यांना चिरडले. यामध्ये तीन पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. इतर एक जखमी झाले आहेत. या जखमीला अकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.
दरम्यान, शेतकऱ्याच्या घरात भरधाव कंटेनर घुसून अंगणात खेळणाऱ्या सख्ख्या बहिणींना चिरडल्याची घडना समोर आली आहे. जालना ते सिंदखेड राजा रोडवरील नाव्हा शिवारात हा अपघात (Accident)घडला. या अपघाताने या शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला असून मुलींच्या मृत्यूमुळे सर्व शिवारातच शोककळा पसरली आहे.
जालना ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नाव्हा शिवारात हायवेला लागूनच एका शेतकऱ्याचे झोपडीवजा घर आहे. घराच्या समोर छोटसं अंगण आणि त्याला लागून हायवे जातो. याच अंगणात या शेतकऱ्याच्या मुली खेळत होत्या. त्यातली एक 5 तर दुसरी 7 वर्षांची होती. खेळण्यात दंग असतानाच अचानक एक मोठा कंटेनर वेगात त्या अंगणातून सरळ घरामध्ये घुसला. त्यावेळी अंगणात खेळत असलेल्या मुली त्या कंटनेरखाली सापडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा...धक्कादायक! होमवर्क पूर्ण केला नाही म्हणून चिमुरडीला भयंकर शिक्षा
या अपघातामुळे घराचेही नुकसान झालं आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा कंटनेर मार्गावरून भरकटला आणि या घरामध्ये घुसल्याचं सांगण्यात येतेय. माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कंटेनरच्या ड्रायव्हरची पोलीस चौकशी करत असून गाडीची कागदपत्रही तपासण्यात येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Maharashtra, Road accident