एकाच रात्रीत चार ATM वर डल्ला, बाइकवरून आले होते भामटे!

बाईकवरुन आलेल्या भामट्यांनी आरी आणि हातोडीच्या मदतीनं SBI, ICICI, बॅंक ऑफ इंडिया आणि IDBI बॅंकेची एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 03:10 PM IST

एकाच रात्रीत चार ATM वर डल्ला, बाइकवरून आले होते भामटे!

नागपूर 22 ऑगस्ट : नागपुरात एकाच रात्री चार ATM फोडण्यात प्रयत्न करण्यात आलाय. खामला परिसरात एक किलोमीटर अंतरावरचे चार एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केलाय. बाइकवरुन आलेल्या भामट्यांनी आरी आणि हातोडीच्या मदतीनं SBI, ICICI, बॅंक ऑफ इंडिया आणि IDBI बॅंकेची एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी पहिलं एटीएम फोडलं, पण त्यातून पैसे काढता आले नाही. मग दुसरं एटीएम फोडलं पण त्यातूनंही पैसे काढता आले नाही. त्यानंतर आणखी दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. कुठल्याही एटीएम मधून चोरट्यांना पैसे काढता आले नाही. खामला बाजार परिसरातील एसबीआयचं एटीएम चोरट्यांनी फोडलं, पण त्यांना त्यातून पैसे काढतां आले नाही. प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीत हे चारंही ATM फोडण्याचा प्रयत्न झाला.

'...म्हणून उद्धव ठाकरेंनी राज यांची बाजू घेतली', सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

बँकांना एटीएमच्या सुरक्षेविषयी वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवण्यास सांगितल्याची माहितीही पोलिसांनी दिलीय. पोलिसांनी केलेल्या पाहणीत अनेक ठिकाणी सुरक्षेत त्रृटी आढळल्या आहेत. तर काही ठिकाणी CCTV योग्य पद्धतीने काम करत नसल्याचंही आढळून आलंय. ATMमध्ये चोरी करणाऱ्या वेगळ्या टोळ्या तयार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. या टोळ्या वेगळी मोड्स ऑपरेंडी वापरून ATM फोडण्याचा प्रयत्न करतात. मात्र बहुतांश वेळी त्यांना अपयशच पदरी पडतं. ATMचे पैसे ज्या ठिकाणी असतात ती तिजोरी फोडणं हे अतिशय अवघड काम असतं. त्यामुळे त्यातून पैसे काढणं शक्य नसतं.

बीडमधील 25 गावातल्या शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर फिरवला नांगर

नागपुरात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून अनेक भागांमध्ये झोपडपट्टी दादांनी उच्छाद मांडलाय. अवैध दारुचे गुत्ते, नागपूरजवळ असलेल्या खाणी, वाढते शहरीकरण आणि अपुरे पोलीस दल यामुळे गुन्हेागारांवर नियंत्रण ठेवणं पोलिसांना शक्य होत नाही. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी एक खास APP तयार केलं होतं. त्या APPमध्ये विभागतल्या सर्व गुन्हेगारांची माहिती फिड करण्यात आली असून त्यांचे फोटोही टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला त्यावरून तक्रारही दाखल करता येणार आहे. या APPचा फायदा नागरिकांना होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...