मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नागपूर उमरेड कऱ्हाड अभयारण्यातील वाघिणीच्या तिसऱ्या बछड्याचाही मृत्यू; वन्यप्रेमींकडून संताप

नागपूर उमरेड कऱ्हाड अभयारण्यातील वाघिणीच्या तिसऱ्या बछड्याचाही मृत्यू; वन्यप्रेमींकडून संताप

येथील एका गावकऱ्याने सूड उगविण्यासाठी या वाघिणींबरोबर तिच्या 5 महिन्यांच्या 3 बछड्यांची हत्या केली.

येथील एका गावकऱ्याने सूड उगविण्यासाठी या वाघिणींबरोबर तिच्या 5 महिन्यांच्या 3 बछड्यांची हत्या केली.

येथील एका गावकऱ्याने सूड उगविण्यासाठी या वाघिणींबरोबर तिच्या 5 महिन्यांच्या 3 बछड्यांची हत्या केली.

नागपूर, 2 जानेवारी : नवीन वर्षाच्या जल्लोष साजरा करण्याच्या पर्वावर उमरेड कऱ्हाड अभयारण्यात वाघीण व तिच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सर्वांनी हळहळ व्यक्त केली होती. तसेच यापाठोपाठ आज तिसरा बछडाही मृतावस्थेत आढळल्याने या घटनेने अधिकच गंभीर वळण घेतलं आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाघिणींसह दोन बछड्यांचा जीव गेल्याने वनविभाग आणि वन्यप्रेमींनी तीव्र भावनेतून संताप व्यक्त केला आहे. वाघिणीसह दोन बछडे मृत झाल्याची घटना 1 जानेवारीला दुपारी उघडकीस आली होती. तिथेच अर्धवट खाल्लेली गाय आढळली होती. त्या गाईवर विषप्रयोग केला असण्याची शक्यता असल्याने चौकशीसाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची टीम आज दाखल झाली होती.

या वाघिणीला तीन बछडे असल्याचे लक्षात आल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता तिसरा देखील मृतावस्थेत आढळला. याप्रकरणी दिवाकर नागोळकर याला अटक केली असून गाईच्या मासावर आपण विष टाकल्याची कबुली त्याने दिली. आपल्या गाईचे वासरू वाघाने मारून खाल्ल्याने बदल्याच्या भावनेतून त्याने हे कृत्य केल्याचं त्यांन सांगितलं. त्याला अटक करण्यात आली असून वन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

सूड उगवण्यासाठी चौघांना दिलं किटकनाशक

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी एक अवैध्य गुराखी असून त्याने सूड उगवण्यासाठी किटकनाशक दिल्याचं कबुल केलं आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने ज्या किटकनाशकाचा वापर केला होता, ते पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

4-5 महिन्यांची होती वाघिण आणि 5 महिन्यांचे होते बछडे

गोवेकरांनी सांगितलं की, वाघिणी सुमारे 4 ते 5 वर्षांची होती तर बघडे 5 महिन्यांचे होते. ते पुढे म्हणाले की, मृतदेहाचे नमुने डीएनए आणि विष विज्ञान संबंधित परीक्षण करण्यासाठी एकत्र करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपीला आज (शनिवार) कोर्टात हजर करण्यात आले.

First published:
top videos

    Tags: Nagpur