यवतमाळ 16 जून: यवतमाळ जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू असतानाच आता ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत आहे. तसेच मृतांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आज जिल्ह्यात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या सात झाली आहे.
कोरोनामुळे आज मृत झालेला व्यक्ती हा 60 वर्षाचा आहे. तोसुध्दा दारव्हा येथील रहिवासी असून त्याचा मृत्यु घरीच झाला. त्याचे नमुने तपासणीकरीता यवतमाळ येथे पाठविले असता त्याचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला. तसेच आज मंगळवारी दारव्हातील 12 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले असून हे सर्व जण सुरवातीच्या पॉझेटिव्ह रुग्णाच्या अगदी निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क काँटॅक्टमधील) आहे.
पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये सहा पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 44 झाली असून सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह 197 झाले आहे. यापैकी तब्बल 146 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकूण सात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये 42 जण भरती आहेत.
राज्यातली संख्या वाढली
Coronavirus मुळे राज्यात नेमके किती मृत्यू झाले आहेत याची संख्या दडवण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला होता. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर 24 तासांच्या आत ठाकरे सरकारने फेरपडताळणी करत COVID-19 च्या मृत्यूंची वस्तुस्थिती सांगणारे आकडे जाहीर केले आहेत.
‘या’ तारखांना लागू शकतात 10वी आणि 12वीचे निकाल, शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत
या फेरपडताळणीत कोविड मृत्यूंची संख्या 1328 ने वाढल्याचं दिसतं. 862 प्रकरणं मुंबई महानगर क्षेत्रातली आणि अन्य जिल्ह्यातले 466 प्रकरणं कोव्हिड मृत्यू म्हणून नोंदवण्यात आले आहेत. याची सविस्तर यादी राज्य सरकारने आता जाहीर केली आहे.
15 जूनपर्यंत राज्यात कोरोनाबळींची संख्या 4128 होती. त्यात आजच्या या फेरपडताळणीनंतर जवळपास 30 टक्क्यांनी वाढली आहे.
अरे देवा! सकाळी पेरणी केली, अन् धुव्वाधार पावसाने संध्याकाळी शेत वाहून गेलं
संकलन - अजय कौटिकवार