BREAKING: माओवाद्यांचा कट उधळला, रस्त्यात पेरला होता क्लेमोर माईन बॉम्ब

BREAKING: माओवाद्यांचा कट उधळला, रस्त्यात पेरला होता क्लेमोर माईन बॉम्ब

क्लेमोर माईन बॉम्बमध्ये बस उडवण्याची क्षमता होती.

  • Share this:

महेश तिवारी,(प्रतिनिधी)

गडचिरोली,4 डिसेंबर: क्लेमोर माईन बॉम्बचा स्फोट घडवून मोठी हल्ला करण्याचा कट गडचिरोली पोलिसांनी बुधवारी उधळला. माओवाद्यांनी पोलिसांना टार्गेट करण्यासाठी रस्त्यात क्लेमोर माईन बॉम्ब पेरला होता. वेळीच घटनास्थळी पोहोचून बॉम्ब निकामी करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. क्लेमोर माईन बॉम्बमध्ये बस उडवण्याची क्षमता होती.

मिळालेली माहिती अशी की, माओवाद्यांनी पोलिस दलाला टार्गेट करण्याच्या हेतूने भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके लाहेरी हद्दीतील लाहेरी-धोडराज रस्त्यावर सुमारे 15 किलोग्रॅम वजनाचा क्लेमोर माईन बॉम्ब पेरला होता. पोलिसांनी राबवलेल्या शोध अभियानात हा बॉम्ब आढळून आला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घटनास्थळी स्फोटके निकामी केल्याने मोठी अनर्थ टळला.

जवानाचा अंदाधुंद गोळीबार; सहा जणांचा मृत्यू

दरम्यान, इंडो-तिबेटियन (आयटीबीपी) बॉर्डर पोलिस दलातील जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार करून स्वतःच गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेत सहा जवानांचा मृत्यू झाला असून दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी 9 वाजता ही घटना घडली. जवानानांमध्ये सुट्टीवरून वाद झाला. सुट्टी न मिळाल्याने संतापलेल्या जवानाने आपल्या 5 सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार करून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेत दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. नारायणपूर जिल्हातील कडेनार गावात स्थित आयटीबीपीच्या 45 व्या बटालियनच्या शिबिरात जवानांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर एका जवानाने गोळीबार केला. अचानक झालेल्या या गोळीबारात सहा जवानांचा मृत्यू झाला आणि दोन जवान गंभीर जखमी झाले. जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या मदतीने तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2019 06:55 PM IST

ताज्या बातम्या