पती-पत्नीचा वाद.. मेहुणीच्या 1 महिन्याच्या मुलीची हत्या, धारदार शस्त्राने केले वार

पारशिवणी पोलीस स्टेशन अंतर्गत बाखरी (पिपळा) गावात पती-पत्नीच्या वादातून एक महिन्याच्या चिमुरडीची हत्या करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 08:12 PM IST

पती-पत्नीचा वाद.. मेहुणीच्या 1 महिन्याच्या मुलीची हत्या, धारदार शस्त्राने केले वार

हर्षल महाजन, (प्रतिनिधी)

नागपूर, 20 ऑगस्ट- पारशिवणी पोलीस स्टेशन अंतर्गत बाखरी (पिपळा) गावात पती-पत्नीच्या वादातून एक महिन्याच्या चिमुरडीची हत्या करण्यात आली आहे. गणेश गोविंद बोरकर (41) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने एक महिन्याच्या बाळाची धारधार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली. रुपाली जितेंद्र पांडे असे मृत चिमुरडीचे नाव आहे.

काय आहे हे प्रकरण?

आरोपी गणेश गोविंद बोरकर हा कुही येथील रहिवाशी आहे. गणेशचे त्याच्या पत्नीसोबत पटत नव्हते. त्यामुळे त्याची पत्नी बाखरी येथे तिच्या माहेर निघून आली होती. मागील काही दिवसांपासून ती वडिलांकडे राहत होती. पती आपल्यासोबत नांदायला तयार नाही, या रागातून आरोपी गणेश सोमवारी (19 ऑगस्ट) दुपारी सासरी (बाखरी) पोहोचला. गणेशने सासरच्या मंडळीसोबत वाद घातला. पत्नीसह सासरच्या लोकांना शिवीगाळ करत गणेश घरात पळत गेला. सोबत आणलेल्या कापडातून त्याने धारदार शस्त्र काढले आणि पाळण्यात झोपलेल्या एक महिन्याच्या रुपालीवर सपासप वार केले. गणेशने केलेले वार एवढे भीषण होते की, चिमुरडीच्या पोटातील आतडे बाहेर आले होते. तिला गंभीर जखमी अवस्थेत कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. चिमुरडीची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून डॉक्टरांनी तिला नागपुरच्या मेये रुग्णालयात रवानी केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत बाळ आरोपी गणेशच्या मेहुणीची मुलगी होती.

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2019 12:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...