सरकार किती काळ चालणार? फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर!

सरकार किती काळ चालणार? फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर!

'जनतेचा जर पाठिंबा असेल तर कुणाचीही चिंता करण्याची गरज नाही. हे सरकार माझं नाही तर लोकांचं आहे.'

  • Share this:

प्रफुल साळुंखे, नागपूर 15 डिसेंबर : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात उद्यापासून (सोमवार 16 डिसेंबर) सुरू होतंय. हे अधिवेशन आठवडाभर चालणार आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आज नागपुरात आगमन झालं. मुख्यमंत्री म्हणून ठाकरे हे पहिल्यांदाच नागपुरमध्ये येत असल्याने शिवसैनिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांसोबतच सर्व सहाही मंत्री नागपुरात दाखल झाले आहेत. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन असल्याने सक्षम असलेल्या भाजपसारख्या विरोधीपक्षाला सरकारला सामोरं जावं लागणार आहे. नागपुरमध्ये आल्यानंतर ठाकरे यांनी एका जाहीरसभेलाही संबोधीत केलं. त्यावेळी त्यांनी भाजपच्या टीकेले उत्तर दिलं.

अजित पवार पुन्हा फॉर्मात... एका दिवसात तब्बल तीन मेळावे, आमदारांना दिला 'दम'

नागपुर हे देवेंद्र फडणवीसांचं गाव आणि बालेकिल्ला त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांचा सत्कारही करण्यात आला. हे सरकार फार काळ टिकणार नाही असं भाजपतर्फे सांगितलं जातं त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या सरकारची खरी सुरुवात नागपुरातून होत आहे. हे सरकार फक्त पाचच नाहीतर पुढची पंचवीस आणि पन्नास वर्षही टिकणार आहे. कारण आम्हाला जनता जनादर्नाला पाठिंबा आहे. जनतेचा जर पाठिंबा असेल तर कुणाचीही चिंता करण्याची गरज नाही असंही ठाकरे म्हणाले.

'झुकली रे झुकली.. मराठी बाणा सांगणारी शिवसेना काँग्रेससमोर झुकली'

देवेंद्र फडणवीसांची टीका

नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार न करणे याचा अर्थ नागपूर अधिवेशन हे या सरकारला 'सिरियस' अधिवेशन वाटत नाही. केवळ वेळकाढूपणाचे धोरण म्हणून हे अधिवेशन कागदोपत्री घेण्याचा फास हे सरकार करत आहे, अशी खोचक टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. मंत्रीच नाही, मग विषय मांडायचे कुणाकडे, असा टोलाही फडणवीस यांनी सरकारला लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

VIDEO: चंद्रपुरात वाघाचा मॉर्निंग वॉक, ग्रामस्थांमध्ये भीती

सध्या महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाला आहे. कारण सुरू असलेली कामं फेरआढावा घेण्यासाठी थांबवण्यात आली आहे. ज्या सरकारमध्ये धोरणांमध्ये सातत्य राहत नाही. राष्टीय पेयजलची कामे, ज्याला केंद्राने 8 हजार कोटींचा आराखडा मंजूर केला आहे, याला स्थगिती सरकारने दिलीय, ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी करत भाजपने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. सेना आमच्यासोबत राज्यात केंद्रात होती, मंत्रिमंडळ जे निर्णय झाले ते एकमताने झाले होते, विरोध झाला नव्हता. आता हे निर्णय कसे चूक होते हे काँग्रेस राष्ट्रवादी हे शिवसेनेकडून वदवून घेत आहेत. आमची जेवढी जवाबदारी आहे, तेवढी सेनेची पण आहे, उत्तरे ही सेनेला पण द्यावी लागतील.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 15, 2019, 5:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading