नागपुरात गुंडांची दहशत, तरुणीच्या घरात घुसून काढली छेड

नागपुरात गुंडांची दहशत, तरुणीच्या घरात घुसून काढली छेड

मंगेश टिचकुले व लकी तेलंग अशी या दोन गुंडांची नावं आहेत. लकी हा मंगेशचा पंटर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

  • Share this:

हर्षल महाजन, नागपूर 18 ऑगस्ट : नागपुरमध्ये गुंडांचा धुमाकूळ काही शांत होण्याची चिन्हं दिसत नाहीत. विविध गुन्ह्यांनी कायम चर्चेत राहणाऱ्या नागपुरात आणखी एक धक्कादायक घटना पुढे आलीय. दोन गुंडांनी एका तरुणीच्या घरात घुसून तिची छेड काढल्याचं प्रकरण समोर आलंय. रात्री हे दोन गुंड तिच्या घरात शिरले आणि त्यांनी तिचा विनयभंग केला अशी तक्रार पीडित तरुणीने दाखल केलीय. हे दोनही गुन्हेगार पोलिसांच्या हिटलिस्टवर असून पोलिसांचा ते सापडत नाहीत मात्र शहरात घुसून राजरोसपणे गुन्हे करतात यावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात येतेय.

मंगेश टिचकुले व लकी तेलंग अशी या दोन गुंडांची नावं आहेत. लकी हा मंगेशचा पंटर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या दोघांची दक्षिण नागपुरात दहशत आहे. तरुणी घरासमोर उभी होती. त्यावेळी लकी व मंगेश तिथे आले. दोघांनी तरुणीला शिवीगाळ करून नियंभंग केला. घटना घडल्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी लकी व मंगेशविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

राष्ट्रवादीच्या आणखी एका गडाला हादरा, फलटणचे ‘राजे’ भाजपमध्ये जाणार?

तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी लकी व मंगेशविरुद्ध रविवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. जवळपास एक आठवड्यानंतर हे प्रकरण उघडतीस आलं असून. लकीविरुद्ध खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मंगेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.याआधीही त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

गुन्हेगारांना शोधण्यासाठी APP

वाढत शहरीकरण आणि देशभरातून येणाऱ्यांचा वाढता लोंढा यामुळं नागपूर शहर गुन्हेगारांचा अड्डा झालाय. चोरी, दरोडे, बलात्कार, क्रीकेट सट्टा, जुगार, छेडखानी अशा गुन्ह्यांची संख्या दररोज वाढतेय. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर पोलीसांनी शहरातील सर्व गुन्हेगारांना एका Appमध्ये डांबलंय. या Appमध्ये पोलिसांनी शहरातील सात लाख गुन्हेगारांचा डेटा फिड केलाय. त्यामुळं नागरिकांना सर्व गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

'ईडी' विरोधात मनसेची बंदची हाक; प्रेमाने ऐकलं तर ठीक, नाही तर 'खळ खट्याक'

रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्यासाठी नागपूर पोलिसांनी एक App तयार केलंय. या 'क्रिमिनल सर्च App'मध्ये पोलिसांनी शहरातील सर्व गुन्हेगारांच्या कुंडल्या फिड केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना गुन्हेरांची माहिती मिळेल आणि गुन्हेगारांवरही वचक राहिल अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त निलेश भरणे यांनी दिली. नागपूर पोलसांनी तयार केलेल्या या Appमुळे गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई होण्यास मदत होईल असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 05:11 PM IST

ताज्या बातम्या