दारु पिण्यासाठी आईने दिले नाही पैसे.. मुलाने आईच्या डोक्यात घातली कुऱ्हाड

दारु पिण्यासाठी आईने दिले नाही पैसे.. मुलाने आईच्या डोक्यात घातली कुऱ्हाड

एका दारुड्या मुलाने जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

बुलडाणा, 18 ऑगस्ट- एका दारुड्या मुलाने जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथे शनिवारी (17 ऑगस्ट) रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दारु पिण्यासाठी आईने पैसे दिले नाही म्हणून मुलाने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. विनोद अवसरमोल असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, अंजनी खुर्द येथील कमलबाई आत्माराम अवसरमोल (वय-64) या मुलगा विनोद यांच्यासोबत राहत होत्या. विनोदला दारुचे व्यसन आहे. त्याने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे विनोदने आईच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. नातेवाईकांनी कमलबाईंना रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. दीपक आत्माराम अवसरमोल यांनी मेहकर पोलीस स्टेशनला तक्रारीवरुन रविवारी सकाळी आरोपी विनोद अवसरमोलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहेत.

SPECIAL REPORT: माणसाच्या संगतीत बोकड गेला वाया, पाल्याऐवजी खर्रा खाण्याचं व्यसन!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 08:27 PM IST

ताज्या बातम्या