लेकासारखा जावई झाला खूनी, सासऱ्याला कायमचं संपवून पत्नीसह सासूवरूही केला हल्ला

लेकासारखा जावई झाला खूनी, सासऱ्याला कायमचं संपवून पत्नीसह सासूवरूही केला हल्ला

चंद्रपूरमध्ये आंतरजातीय विवाह केला म्हणून वाद घालणाऱ्या सासू-सासऱ्यांवरच हल्ला करण्यात आला आहे.

  • Share this:

चंद्रपूर, 17 डिसेंबर : सैराट सिनेमात प्रेम विवाह केल्यानंतर घरच्यांकडून झालेला विरोध आणि अखेर दोघांची हत्या हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. पण चंद्रपूरमध्ये आंतरजातीय विवाह केला म्हणून वाद घालणाऱ्या सासू-सासऱ्यांवरच हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये सासऱ्याचा मृत्यू झाला तर पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाले आहेत. सावली तालुक्यातील हिरापूर इथली घटना आहे.

आंतरजातीय विवाह केल्यामुळे होत असलेल्या नेहमीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. जावयाने केलेल्या या हल्ल्यात सासऱ्याची हत्या तर सासू व पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. ईश्वर मडावी (55) असं मृतकाचं तर मृतकाच्या दोन पत्नी कौशल्या ईश्वर मडावी (50), यामिना ईश्वर मडावी (45) आणि पत्नी मनिषा कांबळे (24) या गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

निलकंठ कांबळे (27)असं आरोपी जावयाचं नाव आहे. हत्या केल्यानंतर तो फरार झाला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या सगळ्या घटनेचा पोलीस तपास सुरू असून आरोपीचा कसून शोध घेण्याचं काम पोलीस करत आहेत. दरम्यान, या जखमींची आणि शेजाऱ्यांची चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - धक्कादायक; मुंबईच्या गर्दीने घेतला तरुणीचा जीव, क्षणात झालं होत्याचं नव्हतं!

पळून जाऊन लग्न करणाऱ्या बहिण आणि पतीवर भावाने केला गोळीबार, नंतर...

मुंबईच्या कांदिवलीमध्ये पळून जाऊन लग्न करणाऱ्या बहिण आणि पतीवर भावाने केला गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी सैराट चित्रपटामध्ये आर्ची आणि परश्याची भावाने खून केल्याचं दाखवण्यात आलं होतं. अशीच एक घटना सुदैवाने कांदिवली परिसरात घडता घडत राहिली. बहिणीने पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून भावाने बहिणी आणि तिच्या पतीवर गोळीबार केला. या घटनेनंतर भावाने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली.

बटुकेश्वर त्रैलोकीनाथ तिवारी(34) असे या भावाचे नाव आहे. बहिणीने सहा महिन्यांपूर्वी रोहित सिंग नावाच्या  तरुणासोबत पळून जाऊन उत्तर प्रदेशमध्ये लग्न केलं होतं. तिवारी कुटुंब हे मुळचं उत्तर प्रदेशमध्ये राहणारं आहे. इतर जातीच्या तरुणासोबत लग्न केल्यामुळे तिवारी कुटुंबाचा संतापाचा उद्रेक झाला होता.

उत्तर प्रदेशमध्ये लग्न केल्यानंतर तिथून पळून बहिणी आणि तिच्या साथीदाराने मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर  कांदिवलीतील  पश्चिम द्रुतगती हायवेला लागून गाव देवी मंदिरजवळ असलेल्या समतानगरमध्ये घरं घेऊन या जोडप्याने आपल्या नव्या संसाराला सुरुवात केली.

आपली बहिणी ही मुंबईत राहते हे कळल्यावर भाऊ बातेश्वर तिवारी तिच्या घरी पोहोचला. आज साडे आठ वाजताच्या दरम्यान बातेश्वर बहिणीच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने बहिणीवर आणि तिच्या पतीवर गोळीबार केला.  परंतु, त्याची बहीण आणि पती घराबाहेर पळल्यानं वाचलं. त्यानंतर बटुकेश्वर याने  स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली .

इतर बातम्या - माहिम सूटकेस हत्याकांडात आधार कार्डामुळे नवं ट्वीस्ट, आरोपी लेकीबद्दल खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2019 09:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading