मुलाचा खून करायला गेले आणि बापालाच मारून टाकलं, एका मेसेजमुळे गेला जीव

मुलाचा खून करायला गेले आणि बापालाच मारून टाकलं, एका मेसेजमुळे गेला जीव

मुलाचा सोशल मीडियावर झालेल्या वादामुळे वडिलांना जीव गमवावा लागला आहे. नागपूरच्या पांढराबोडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

नागपूर, 5 ऑक्टोबर : सोशल मीडियावर 17 वर्षीय रितेश नहारकर याच्यासोबत वाद झाल्यानंतर काही तरुणांनी घरात घुसून रितेशसह त्याच्या वडिलांवर हल्ला केला. यामध्ये 40 वर्षीय वडील अशोक नहारकर यांचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या पांढराबोडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

जवळपास 2 महिन्यांपूर्वी रितेश नहारकर याने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर गुन्हेगारी प्रवृत्तीसंदर्भात एक कॉमेंट केली. यावरून त्याचा काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांसोबत वाद झाला. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानंतर तेव्हा हा मिटला. मात्र आता 2 महिन्यांनी पुन्हा हा वाद उफाळून आला आणि ते तरुण चाकू आणि इतर धारदार शस्त्रांसह रितेश नहारकर याला मारण्यासाठी त्याच्या घरी दाखल झाले.

प्रियकरासोबत नाही करता आले लग्न,19 वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

यावेळी आपल्या मुलावर होणारा हल्ला थांबवण्यासाठी रितेशचे वडील अशोक नहारकर पुढे सरसावले. मात्र गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी त्यांच्यावरच हल्ला केला. या हल्ल्यात अशोक नहारकर हे जखमी झाले. त्यांना गंभीर जखम झाल्याचं लक्षात येताच हल्लेखोरांनी त्यांना रुग्णालयात नेण्याचा बहाणा केला आणि रुग्णालयात नेताना पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला.

महाराष्ट्रात संतापजनक घटना, भावानेच अल्पवयीन बहिणीवर केला बलात्कार

हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या अशोक नहारकर यांना रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, या भयंकर घटनेनंतर नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुलाचा सोशल मीडियावर झालेल्या वादामुळे वडिलांना जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published: October 5, 2020, 6:54 PM IST
Tags: Murder

ताज्या बातम्या