प्रियकरासमोरच प्रेयसीचा शॉक लागून मृत्यू

या कुंपणाजवळून जाताना तरुणीला जोरदार धक्का बसला. ती धक्का बसून व्हिवळत असतानाच प्रियकराने तिला वाचविण्याचा दोनदा प्रयत्न केला मात्र तो वीज प्रवाहाच्या धक्क्याने दूर फेकला गेला.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 06:08 PM IST

प्रियकरासमोरच प्रेयसीचा शॉक लागून मृत्यू

हैदर शेख, चंद्रपूर 02 सप्टेंबर : वरोरा तालुक्यातील मजरा शेत शिवारात दुर्दैवी घटना घडलीय, शिवारमार्गे जाणाऱ्या एका प्रेमी युगलाला शेतकुंपणाला लावलेल्या तारांचा जोरदार धक्का बसला. या शेताला जंगली प्राण्यांच्या संरक्षणासाठी तार कुंपण लावलं होतं. त्या कुंपणात वीज प्रवाह सोडण्यात आला होता. या कुंपणाजवळून जाताना तरुणीला जोरदार धक्का बसला. ती धक्का बसून व्हिवळत असतानाच प्रियकराने तिला वाचविण्याचा दोनदा प्रयत्न केला मात्र तो वीज प्रवाहाच्या धक्क्याने दूर फेकला गेला.

शेतकरी विठ्ठल गेडाम यांनी त्यांच्या शेताच्या धुऱ्यावर कुंपण घालत त्यात वीज प्रवाह सोडला होता. त्याच्या जवळून हेमंत दडमल आणि कोमल गराटे हे जोडपं जात होतं. कोमलचा हात ताराला लागला आणि ती धक्क्याने तारावरच कोसळली. हेमंतने तिला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्याला यश आलं नाही. तो दोनदा दूर फेकला गेला. यातच कोमलचा मृत्यू झाला. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केलीय.

'युती'चा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार', शिवसेनेची गुगली!

या भागात जंगली रानडुकरं आणि प्राण्यांचा प्रचंड त्रास आहे. त्यामुळे शेतकरी शेताला कुंपण लावून त्यात वीजप्रवाह सोडत असतात. रानडुकरं हे अख्ख शेतच उदध्वस्त करून टाकतात. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं. त्यामुळे वनविभागही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

एका मॅकॅनिकलच्या मुलानं जग जिंकले, प्रेरणादायी प्रवास वाचून व्हाल थक्क!

Loading...

शेतीच्या नुकसानीच्या अनेक घटना घडत असल्याने शेतकरी अशा प्रकारचं कुंपण घालतात. प्राण्याचा बदोबस्त कसा करायचा असा प्रश्न वनखात्याला आहे. जंगलाचं कमी होणारं प्रमाण. वाढणारे प्राणी, कमी होणारे पाणवठे यामुळे प्राण्यांचं शिवरात येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. यातून प्राणी आणि मानव संघर्षाच्या अनेक घटना घडतात. आणि असे अपघातही घडत असतात. अशाच प्रकरणात आज एका तरुणीचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 06:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...