Home /News /maharashtra /

एसटी मंडळात 18 दिवसांचं धक्कादायक वास्तव; अश्लील चाळे, शरीरसुखाची मागणी आणि....

एसटी मंडळात 18 दिवसांचं धक्कादायक वास्तव; अश्लील चाळे, शरीरसुखाची मागणी आणि....

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

राज्य परिवहन मंडळामध्ये महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    अकोला, 26 जून : राज्य परिवहन मंडळामध्ये महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य परिवहन मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या महिलेला कामावरून काढण्याची धकमी दिली आणि त्याबदल्यात शरीरसुखाची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाविरोधात पीडित महिलेने पोलिसांत गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. 'लोकमत'मध्ये आलेल्या वृत्तानुसार, राज्य परिवहन मंडळाच्या वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली आणि शरीर सुखासाठी वारंवार मागणी केली. कौलखेड रोडवरील वर्कशॉप ऑपरेटर सेक्शनमधील सहायक पदावर काम करणाऱ्या अतुल पोजगे याविरोधात महिला अधिकाऱ्याने खदान पोलिसांत विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याला कोरोनाची लागण, सोबत 11 जण पॉझिटिव्ह या घटनेनंतर आरोपी फरार झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ऑफिसमध्ये येता-जाता अतुल पोजगे सतत शारीरिक छळ करायचा. अश्लील चाळे करायचा. त्यात तो विभागामध्ये महत्त्वाचा अधिकारी असल्यामुळ त्याने कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली आणि तसं नको व्हावं वाटेत असेल तर शरीर संबंध ठेवण्यासाठी विचारणा केल्याचं महिलेने सांगितलं. Coronavirus in India: 24 तासांत कोरोनाचा कहर, आजची धक्कादायक आकडेवारी समोर तब्बल 18 दिवस सुरू होता छळ महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या 2 ते 20 जून प्रचंड छळ केला. वारंवार ऑफिसमध्ये अश्लील चाळे केले. कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आरोपीवर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. महाराष्ट्रातील शहीद वीरपुत्रांवरून शिवसेनेची भाजपवर जहरी टीका, म्हणाले... संकलन आणि संपादन - रेणुका धायबर
    First published:

    Tags: Sexual harassment, Women harassment

    पुढील बातम्या