आदित्य ठाकरेंना शिवसेनेच्या मंत्र्याने दिली 'या' मतदारसंघातून निवडणूक लढण्याची ऑफर

आदित्य ठाकरेंना शिवसेनेच्या मंत्र्याने दिली 'या' मतदारसंघातून निवडणूक लढण्याची ऑफर

'आदित्य ठाकरेंनी फक्त उमेदवारीचा फॉर्म भरण्यास यावे आम्हीच त्यांना सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून विजयी करू'

  • Share this:

दिग्रस 28 ऑगस्ट : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची 'जन आशीर्वाद यात्रा' आज विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात होती. यावेळी दिग्रसचे आमदार आणि मंत्री संजय राठोड यांनी आदित्य ठाकरेंना दिग्रस मतदारसंघातून निवडणुक लढवण्याचा आग्रह केलांय. इतकचं नाही तर त्यांनी फक्तं उमेदवारीचा फॉर्म भरण्यास यावे आम्हीच त्यांना सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून विजयी करू असं आश्वासनही दिलं. या निमंत्रणावर आदित्य ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र 'जन आशीर्वाद यात्रा' राज्यात जीथे जाईल तीथं आदित्य ठाकरेंना निवडणुक लढवण्यासाठी आग्रह धरला जातोय, हे पुन्हा एकदा समोर आलं.

उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?

राज्यातल्या विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. नेत्यांच्या यात्रा आणि सभांनी त्यात रंग भरलाय तर पक्षांतराने अनेकांना धक्के बसताहेत. भाजप आणि शिवसेनेचं चांगलंच जमलं असून आता जागावाटपाबद्दल चर्चा सुरू झालीय. कुणाला कुठल्या जागा याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. तर युवा सेनाप्रमुख आदित्य

ठाकरे यांना शिवसेना जोरदार प्रोजेक्ट करत असल्याने ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी चर्चा आहे. यावर जेव्हा आदित्य ठाकरेंना सोमवारी प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं त्यावरून सस्पेन्स आणखीच वाढला आहे. जनता देईल ती जबाबदारी घेणार असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

आम्ही काही भिकाऱ्याची अवलाद नाही, राजू शेट्टींचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री म्हणून प्रोजक्ट

आदित्य यांनी जेव्हा जन आशीर्वाद यात्रा सुरू केली तेव्हा खासदार संजय राऊत यांनी आदित्य यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजक्ट केलं होतं. नंतर आदित्य यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याचीही चर्चा होती. त्यावर उत्तर देत आदित्य यांनी सस्पेन्स वाढवल्याने चर्चेला आणखी बळ मिळणार आहे. भाजप आणि शिवसेनेतल्या जागावाटपाच्या चर्चेवरही आदित्य यांनी उत्तर देत भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, युती बद्दल मी बोलणार नाही. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात युती बद्दल चर्चा झाली आहे. तेच या बद्दल बोलतील. मी त्यांच्या समोर खूप लहान आहे. म्हणून युतीबद्दल मी बोलणार नाही. आम्ही पक्ष किंवा सरकार म्हणून नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. कर्जमाफी उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारामुळे झाली, मात्र आमचा उद्दिष्ट कर्जमुक्ती आहे. पीक विमा योजनेसाठीही आम्ही लढत आहोत. सरकारने जी कर्जमाफी केली, त्यात अनेक त्रुटी आहेत, त्या दूर झाल्या पाहिजे. जिथे सरकार करणार नाही तिथे आम्ही आंदोलन करू असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांमध्ये मला विरोधी पक्षनेता दिसतो, थोरातांचा पलटवार

लोकसभा निवडणुकाच्या वेळी जी प्रेस कॉन्फरेन्स झाली होती, त्यात सर्व स्पष्ट होते. त्यापुढे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये युतीबद्दल चर्चा होत आहे. मी बोलणे योग्य नाही. ही युती मुद्द्यांसाठी आहे. सत्तेसाठी नाही. आमच्या समोर कर्ज मुक्ती, विकास, राम मंदिर असे अनेक मुद्दे आहे. ते आम्हाला साध्य करायचे आहेत असंही ते म्हणाले. विरोधी पक्ष आहे कुठे असा सवालही त्यांनी केला. मला त्यांच्याबद्दल बोलायचे नाही. विरोधी पक्षाला जर प्रश्न उचलायचे आहे तर त्यांनी जनतेचे प्रश्न उचलावेत असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 09:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading