उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न झाल्याचा धक्का.. शिवसैनिकाने स्वत:वर केले ब्लेडने वार

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न झाल्याचा धक्का.. शिवसैनिकाने स्वत:वर केले ब्लेडने वार

रमेश जाधव हे शनिवारी काही कामानिमित्त दिग्रस येथे आले होते. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचे सकाळी 10 वाजतादरम्यान त्यांना समजले.

  • Share this:

यवतमाळ,23 नोव्हेंबर: महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठी उलथापालथ झाली. शिवसेना आणि काँग्रेसला डावलून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न झाल्याचा धक्का सहन न झाल्याने एका शिवसैनिकाने स्वत:वर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच उपचार झाल्याने तो थोडक्यात बचालवला. ही खळबळजनक घटना दिग्रस येथे घडली.

मिळालेली माहिती अशी की, रमेश बाळू जाधव (रा.उमरी, ता.मानोरा, जि.वाशिम) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकाचे नाव आहे. रमेश जाधव हे शनिवारी काही कामानिमित्त दिग्रस येथे आले होते. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचे सकाळी 10 वाजतादरम्यान त्यांना समजले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न झाल्याचा धक्का रमेश यांना सहन झाला नाही. त्यांनी मानोरा चौकात स्वतः वर ब्लेडने वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, चौकात उभे असलेले वाहतूक पोलिस युवराज चव्हाण यांनी रमेश यांनी जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रमेश यांच्यावर तातडीने उपचार केल्याचे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

महाराष्ट्रात मोठी उलथापालथ

मुंबईतील राजभवनात शनिवारी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्री मोठी उलथापालथ झाली.

सत्तासंघर्ष सोडवण्यासाठी महाविकासआघाडीकडून सातत्यानं बैठकांचा सिलसिला सुरू होता. आज चर्चा अंतिम टप्प्यात येणार असल्याची चर्चाही होती. अखेरच्या टप्प्यात सगळं ठरत असताना मात्र अचानक राजकीय भूकंप आला आणि थेट राजभवनात मुख्ममंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. महाविकासआघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार होती मात्र त्याआधीच शनिवारी शपथविधीसोहळा पार पडल्यानं अनेक सवालही उपस्थित होत आहेत. महिन्याभरापासून सुरु असलेला सत्तसंघर्षाचा तिढा अखेर सुटला आणि एक वेगळे समीकरण समोर आले आहे.

First published: November 24, 2019, 12:14 PM IST
Tags: shiv sena

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading