शिवसेनेच्या या महिला खासदाराची 'दबंग'गिरी, रेल्वे अधिकाऱ्यांना धरले धारेवर

शिवसेनेच्या या महिला खासदाराची 'दबंग'गिरी, रेल्वे अधिकाऱ्यांना धरले धारेवर

शिवसेना खासदार भावना गवळी यांनी दबंग स्टाईल आपल्या कार्यकर्त्यांसमवेत रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

  • Share this:

किशोर गोमाशे,(प्रतिनिधी)

वाशिम,3 ऑक्टोबर: वाशिम रेल्वे स्थानकावरील पार्किंग कंत्राटदारांची दादागिरी वाढत असल्यामुळे सामान्य जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात शिवसेना खासदार भावना गवळी यांनी दबंग स्टाईल आपल्या कार्यकर्त्यांसमवेत रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

पार्किंगच्या अनागोंदी कारभारात अधिकारी सामील असल्याचा आरोप खासदार भावना गवळी यांनी केला. या अगोदर काही शिवसेना कार्यकर्त्यांचा पार्किंग चालक ठेकेदारासोबत वाद झाला होता. त्यामुळे खासदार गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. वाशिम रेल्वे स्थानकावरील पार्किंगचे उद्यापासून पार्किंगचे नियम बदलून एका तासापर्यंत कोणीही पार्किंग शुल्क देऊ नये, असे आवाहन खासदार भावना गवळी यांनी वाहनधारकांना केले आहे.

काँग्रेसच्या ठाकरेंना शिवसेनेचा 'पंच'

लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदार संघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना 'पंच' देऊन दणदणीत विजय मिळवला. भावना गवळी यांनी पाचव्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे.

या मतदारसंघातील आधीचा इतिहास पाहता शिवसेनेने यंदाच्या निवडणुकीतही विद्यमान खासदार भावना गवळी यांनाच मैदानात उतरवण्याचे ठरवले. त्यांच्याविरोधात काँग्रेसनंही माणिकराव ठाकरेंसारखा तगडा उमेदवार रिंगणात उतरवला होता. म्हणून काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. गवळींच्या करिष्म्यासमोर काँग्रेसच्या ठाकरेंचं आव्हान फिके पडले. भावना गवळींनी आपला गड कायम राखत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, मंत्री, उपसभापतीपदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या माणिकराव ठाकरे यांचा दणदणीत पराभव केला.

भावना गवळींचा 'पंच'

-1999 : तेरावी लोकसभा निवडणूक, (पहिली टर्म)

-2004 : चौदावी लोकसभा निवडणूक,(दुसरी टर्म)

-2009 : पंधरावी लोकसभा निवडणूक,(तिसरी टर्म)

-2014 : सोळावी लोकसभा निवडणूक,(चौथी टर्म)

-2019 : सतरावी लोकसभा निवडणूक,(पाचवी टर्म)

संजय राऊतांचा SMS जेव्हा अजितदादा वाचून दाखवतात, पाहा हा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: November 3, 2019, 7:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading