'पोर्नोग्राफी, सामूहिक बलात्कार कसा करायचा याच्या व्हिडिओचा भारतात मोठा व्यापार'

'पोर्नोग्राफी, सामूहिक बलात्कार कसा करायचा याच्या व्हिडिओचा भारतात मोठा व्यापार'

उत्तर प्रदेशातील उन्नावसारखी घटना महाराष्ट्रात होणार नाही, याबाबतही काळजी घ्यायला हवी...

  • Share this:

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर,9 डिसेंबर: कळमेश्वर तालुक्यातीस लिंगा गावात 6 वर्षीय चिमुरडीच्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी 'कळमेश्वर बंद'ची हाक दिली आहे. चिमुरडीला न्याय मिळावा या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. कळमेश्वरमध्ये सर्व दुकान बंद करण्यात आली आहे. आरोपी संजय पुरीला आमच्या ताब्यात द्या, फाशी किंवा त्याचा एन्काऊंटर करा (हैदराबादप्रमाणे) अशी मागणीने जोर धरला आहे. दरम्यान, या प्रकरणी शिवसेना नेत्या आणि विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तिव्र प्रतिक्रिया दिला आहे.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, नागपूरचे पोलिस निरीक्षकांशी या प्रकरणी फोनवर चर्चा झाली आहे. लवकरात लवकर न्याय मिळावा, यादृष्टीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. डीएनए (DNA)करण्यासाठी पोलिसांना सुचवले आहे. ज्या मुली प्रतिकार करू शकत नाही. अशा मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याच्या घटनामध्ये राज्यात वाढ झाली आहे. वाशिमलाही अशीच एक घटना घडली आहे.

व्हिडिओचा भारतात मोठा व्यापार..

पोर्नोग्राफी आणि सामूहिक बलात्कार कसा करायचा, याच्या व्हिडिओचा मोठा व्यापार भारतात होत आहे. त्यामुळेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. यापाश्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन दिल्याचे नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. त्यात सर्व द्रुतगती मार्गावर ऑनलाइन देखरेख झाली पाहिजे. एखाद्या रस्त्यावर मुलीची छेडछाड होत असेल, असे दिसले की लगेच तिला मदत मिळायला हवी. अत्याचाराच्या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागायला हवा. त्याच्यात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या मुली अशा घटनानंतर बचावल्या आहेत त्यांना साक्षीदार संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण द्यायला हवे, तसेच उत्तर प्रदेशातील उन्नावसारखी घटना महाराष्ट्रात होणार नाही, याबाबतही काळजी घ्यायला हवी, असे मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे...

संतप्त नागरिकांनी आंदोलन करत गावात कडकडीत बंद पुकारला आहे. दरम्यान, कळमेश्वरमध्येही पोलिस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. तेथील नागरिकांशी तिव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी चिमुकलीच्या वडिलांनी केली आहे.

काय आहे हे प्रकरण?

लिंगा या गावापासून जवळ पीडित मुलीच्या आजीचे घर आहे. मुलगी शुक्रवारी सकाळी आजीकडे जाण्यासाठी घरातून निघाली होती. ती आजीकडे गेली असेल असे समजून तिच्या आई-वडिलांनी तिचा शोध घेतला नाही. मात्र, शनिवारी सकाळी मुलगी आजीकडे गेली नसल्याचे समजताच आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तिचा शोधा सुरू केला. आजूबाजूचा परिसर अक्षरश: पिंजून काढला. परंतु ती सापडली नाही. शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास गावाजवळील एका झुडपात मुलीचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. मुलीवर अत्याचार झाला की नाही याबाबत आपण आत्ताच काही सांगता येत नासल्याचे पोलिसांनी सांगितलं होतं. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबाबत काही बोलता येईल, असेही पोलिसांनी म्हटलं होतं. दरम्यान, या घटनेमुळे गावात संतापाची लाट आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस लक्ष ठेवून आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: December 9, 2019, 2:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading