सत्तास्थापना सध्याच शक्य नाही, वेळ लागणार, शरद पवारांचं सगळ्यात मोठं विधान

सत्तास्थापना सध्याच शक्य नाही, वेळ लागणार, शरद पवारांचं  सगळ्यात मोठं विधान

17 नोव्हेंबर हा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे. त्या दिवशी राज्यात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांने शपथ घ्यावी असं स्वप्न शिवसेना नेत्यांचं आहे.

  • Share this:

मुंबई 15 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेचा घोळ सुरू असताना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची चर्चाही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलंय. सत्ता स्थापना सध्याच शक्य नाही त्याला वेळ लागेल असं पवारांनी नागपूरात अनौपचारिक चर्चेदरम्यान सांगितल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झालाय. पवार हे नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी हे विधान केल्याने या तिनही पक्षांमध्ये सुरू असलेली चर्चा लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा शिवसेनेलाही धक्का असेल असं मानलं जातंय. 17 नोव्हेंबर हा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे. त्या दिवशी राज्यात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांने शपथ घ्यावी असं स्वप्न शिवसेना नेत्यांचं आहे. त्यामुळे सगळी बोलणी आटोपून 17 तारखेला नवं सरकार अस्तित्वात यावं असं उद्धव ठाकरे यांची इच्छा असल्याचं बोललं जातं. त्यामुळे पवारांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जातंय.

शिवसेना हिंदुत्व सोडणार का? सावरकरांच्या नातवानं व्यक्त केला हा विश्वास

नागपूरात आलेल्या शरद पवारांनी आज काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी पवारांना भेटायला आलेले एक गृहस्थ हे भिष्माचार्यांनी लवकरात लवकर सरकार आणून इतिहास घडवावा असं सांगतात त्यावर पवारांनी हे उत्तर दिलंय.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि महाआघाडीमध्ये जोर बैठका सुरू आहे. समन्वय समितीच्या बैठकीत अंतिम मसुदा पूर्ण होणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं आहे. परंतु, सेनेनं आपला मुख्यमंत्री हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शपथ घेणार असं सेनेनं घोषणा केली होती. आता हा 17 तारखेला शपथविधी होणार काय याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं आहे.

राज्यात सत्तास्थापनेच्या वाटाघाटी सुरू असताना आता सत्तास्थानपेच्या तिढ्यावर राजधानीतही खलबतं होणार आहेत. 17 नोव्हेंबर रोजी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट होणार आहे. त्यावेळी किमान कार्यक्रमाच्या मसुद्यावर निर्णय होणार असं कळतं आहे, अशी माहिती सूत्रांनी न्यूज१८ लोकमतला दिली.

एकीकडे शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासाठी भाजपपासून दूर राहणे पसंत केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेनेच्या नेत्यांनी बैठकी पार पडल्या आहे. आता शरद पवार आणि सोनिया गांधींची दिल्लीत बैठक होत आहे. त्यामुळे नेमकं 17 तारखेला सेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

महाशिवआघाडीच्या मुसद्याला अंतिम स्वरूप

दरम्यान, याआधी आज गुरुवारी मुंबईत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक पार पडली.या बैठकीमध्ये जवळपास सर्वच मुद्यांवर चर्चा पूर्ण झाली आहे. यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. या बैठकीतला मसुद्दा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, असे संकेत काँग्रेसचे नेते विजय वट्टेटीवार यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2019 07:32 PM IST

ताज्या बातम्या