91वे अ. भा. साहित्य संमेलन बडोद्यातच होणार

91वे अ. भा. साहित्य संमेलन बडोद्यातच होणार

91 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अखेर बडोद्यात होणार आहे. अ.भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी यासंबंधीची घोषणा केलीय.

  • Share this:

नागपूर, 18 सप्टेंबर : 91 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अखेर बडोद्यात होणार आहे. अ.भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी यासंबंधीची घोषणा केलीय. यापूर्वी हे संमेलन बुलढाणा जिल्ह्यातल्या हिवरा इथल्या विवेकानंद आश्रमात होणार होतं पण श्याम मानव यांच्या अ. भा. अंनिसने त्याला आक्षेप घेतल्यानं महामंडळाने तो निर्णय रद्दबातल ठरवला होता. संमेलन भरवण्यासाठी दिल्ली, बडोदा या दोन्ही साहित्य परिषदेने प्रस्ताव दिले होते. त्यापैकी महामंडळाने बडोद्याचा प्रस्ताव स्वीकारलाय.

बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा इथल्या विवेकानंद आश्रमात अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला होता. काही नामवंत साहित्यिकांनीही बुलढाण्यातल्या नियोजित संमेलनस्थळाला विरोध केला. त्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी बडोदा साहित्य परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर यांना फोन करुन संमेलन भरवण्यासंदर्भात विचारणा केली. त्यांनी संमेलन भरवण्यास होकार कळवल्यानंतर ही घोषणा करण्यात आलीय.

आता 91 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन बडोद्यात होणार असल्याने संमेलन स्थळाला राजे सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी असं दिलं जाऊ शकतं, अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.

First published: September 18, 2017, 8:38 PM IST

ताज्या बातम्या