पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसणात गेले होते का? सदाभाऊंचा हल्लाबोल

'राष्ट्रवादीवाले हे सगळे रिकामटेकडे असून निवडणूक डोळ्यापुढ ठेवून लोकांची मनं भडकवण्याचं काम करत आहे.'

News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2019 04:46 PM IST

पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसणात गेले होते का? सदाभाऊंचा हल्लाबोल

नरेंद्र मते वर्धा 15 ऑगस्ट : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्याला पुराचा तडाखा बसलाय. कोल्हापूरला सर्वाधिक तडाखा बसलाय. या पुरानं आपल्याला धडा शिकवला. अशी बिकट स्थिती असताना राष्ट्रवादीचे लोक राजकारण करताहेत. पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले 'मसना'त गेले होते का? अशी बोचरी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलीय. कोल्हापूरचे असुनही सदाभाऊ खोत यांनी पुरग्रस्तांना योग्य प्रकारे मदत केली नाही अशी टीका राष्ट्रवादीने केली होती. त्यामुळे संतापलेल्या सदाभाऊ खोत यांनी ही बोचरी टीका केली.

रक्षाबंधनाच्याच दिवशी बहिण भावावर काळाचा घाला, मुलीची मृत्यूशी झुंज

वर्ध्यात स्वातंत्र्यदिन सोहळ्याला मंत्री सदाभाऊ खोत आले होते. यावेळी खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला खडेबोल सुनावले. ते म्हणाले, या पुराचं राजकारण करू नये. हे संकट निसर्ग निर्मित आहे. भविष्यकाळात अस संकट आल्यास सक्षमपणे तोंड देण्यासाठी नियोजन करावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या पुराशी देणंघेणं नाही. त्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. हे काम राष्ट्रवादी मोठ्या तडफेन करत आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं कोरडी सहानुभूती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय.

बिबट्या मादी आणि तिच्या पिलाच्या भेटीचा चटका लावणारा VIDEO तुम्ही पाहिलाच पाहिजे

ते पुढं म्हणाले, 2005 मध्ये त्यांच्या काळात पूर आला असता तेव्हा पर्यायी व्यवस्थेवर काम का केलं नाही. राष्ट्रवादीचे नेते लोकांची मनं भडकवण्याचं काम करत आहे. मदत करत नाही. मदत करायची असेल तर जनावरांना चारा पोहोचवा, एक, दोन गावं दत्तक घ्या, गावं उभी करण्याची कामं करा. 2005 मध्ये त्यांचं सरकार असताना किती मदत द्यायचे याचे आकडे त्यांनी जाहीर करावे. आम्ही मदत वाढवली आहे.

Loading...

पण मदत न करता विभागात फिरायचं, भाषणं द्यायची, मुलाखती देत फिरायचं असं त्यांचं काम आहे. पुढील आमदारकीच्या जागा कशा वाढतील, या दृष्टीन राष्ट्रवादीवाले काम करत आहेत. ज्यावेळी पूर आला तेव्हा आले असते, पाण्यात उतरले असते, चार दोन बोटी घेऊन आले असते तर स्वागत केलं असत. लोकांचे अश्रू पुसायचा त्यांचा कार्यक्रम नाही. लोकांची मन भडकवून सरकार विरोधी वातावरण तयार करायचं काम राष्ट्रवादीवाले करत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

आदित्य ठाकरेंनी मुहूर्त साधला, विधानसभेआधी कोळी बांधवांच्या भावनांना साद

शेतकऱ्यांचा पुळका आहे तर मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार का केला, तेव्हा प्रेम कुठ गेलं होत, असा सवालही त्यांनी केला. आता हे सगळे रिकामटेकडे निवडणूक डोळ्यापुढ ठेवून लोकांची मनं भडकवण्याचं काम करत आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 04:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...