इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासह 6 अट्टल गुन्हेगारांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासह 6 अट्टल गुन्हेगारांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

या टोळीचा मोरक्या असलेला अमजद याने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.

  • Share this:

भास्कर मेहरे,(प्रतिनिधी)

यवतमाळ,14 डिसेंबर: यवतमाळ पोलिसांनी शनिवारी 6 अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांनी यवतमाळ जिल्ह्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होती. दररोज शहरात कुठे ना कुठे घरफोडी झाल्याच्या घटना समोर येत होत्या. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करून 6 अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले.

टोळीचा मोरक्या सिव्हिल इंजिनिअर

पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे या टोळीचा छडा लावण्यात आला. या टोळीचा मोरक्या असलेला अमजद याने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. या टोळीकडून 7 गावठी बनावटीचे पिस्तूल, 118 जिवंत कडातूसे, 17 धारदार चाकू, 7 तलवारी, आणि 22 मोटरसायकल असा एकूण 14 लाख 34 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या टोळक्याकडून 8 मोठ्या घरफोडी आणि इतर 6 चोरीच्या घटना केल्याचे उघडकीस आले आहे.

अमजद खान सरदार खान, देव ब्रम्हदेव राणा (रा. रोहतक, हरियाणा), मोहम्मद सोनू मोहम्मद कमाल (मधेपुरा, बिहार), मोहम्मद आसिफ मोहम्मद अफजल (रा. दिग्रस) सागर रमेश हसनापुरे (मंगरूळ, दस्तगिर जि. अमरावती), लखन देविदास राठोड (रा.मोरगव्हान, जि. यवतमाळ) अशी आरोपींची नावे आहेत. या टोळक्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिस त्यांचा कसून चौकशी करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली आहे. अमजद खान सरदार खान याच्यासारखे उच्चशिक्षित तरुण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असल्याने एम. राजकुमार यांनी चिंताही व्यक्त केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 14, 2019, 8:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading