काय सांगताsss चोर म्हणून आला अन् नवरदेव बनून गेला!

काय सांगताsss चोर म्हणून आला अन् नवरदेव बनून गेला!

नागपुरातील एक कापड दुकान फोडत चोरट्याने 2 लाख रुपये रोख आणि महागडे चोरले. हा चोरटा एवढ्यावरच थांबला नाही तर चोरी केल्यानंतर त्यानं दुकानाच्या टेरेसवर आंघोळ केली.

  • Share this:

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर, 5 सप्टेंबर: नागपुरातील एक कापड दुकान फोडत चोरट्याने 2 लाख रुपये रोख आणि महागडे चोरले. हा चोरटा एवढ्यावरच थांबला नाही तर चोरी केल्यानंतर त्यानं दुकानाच्या टेरेसवर आंघोळ केली. आपले फाटके कपडे दुकानात काढून नवरदेवाचा पहेराव करून तिथून पसार झाला. चोरीचा हा घटनाक्रम दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नागपुरातील महाल आयचीत मंदिर भागातील आकाश मॉलमध्ये ही घटना घडली. दुकानाचे मालक सुमीत अरोरा यांनी 31 ऑगस्टला दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी दुकान उघडले असता त्यांना दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. एक चोरटा त्यांच्या कुलरची थंड हवा असलेल्या जागेसाठी बनवलेल्या डक्टमधून दुकानात शिरला. चोरट्यानं दुकानात आत आल्यानंतर अगोदर या गल्ल्यावर हात साफ केला. नंतर चोरट्याने थेट दुकानाच्या टेरेसवर जाऊन आंघोळ केली. त्यानंतर नवरदेवाचा सूट परिधान केला आणि पोबारा केला. चोरीची ही घटना दुकानातीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या चोरट्याने दुकानातील काही महागडे कपडेही बॅगमध्ये भरले आणि तिथून पसार झाला. दुकानापासून काही अंतर पायी चालल्यानंतर तो ऑटो करून नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचला. नागपूर रेल्वे स्टेशनरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही तो कैद झाला आहे. या प्रकरणी आकाश मॉलचे मालक सुमित अरोरा यांनी पोलिसांत चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी शरीर सुखासाठी केली चक्क तीन मुलींची मागणी

लाच म्हणून पैसे, दागिने, भेटवस्तू... हे प्रकार तुम्हा-आम्हाला माहीत आहे. पण नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेतील दोन पोलिसांनी चक्क लाच म्हणून शरीर सुखासाठी तीन मुलींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक मागणीचे पुरावे हाती आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी (एसीबी) दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 01:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading