मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुलीला आधी विष पाजले नंतर अत्याचार, अमरावती जिल्ह्यातली संतापजनक घटना

मुलीला आधी विष पाजले नंतर अत्याचार, अमरावती जिल्ह्यातली संतापजनक घटना

आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे. अशा आरोपींना फासावर लटकवा अशी मागणही महिला संघटनांनी केली आहे.

अमरावती 15 ऑक्टोबर: हाथरसमधल्या घटनेने सर्व देशभर उद्रेक निर्माण झाला होता. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांविरुद्ध देशात संतापाची लाट उसळली होती. मात्र याचा काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही. अमरावती जिल्ह्यातल्या वरूडजवळ माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला विष पाजून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला आधी विष पाजलं आणि नंतर तिच्यावर अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न प्रयत्न करण्यात आला. वरूड तालुक्यातील एका गावात समोर आला आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून 55 वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

अत्याचार झालेली पीडित तरुणी ही आपल्या घराचे दार बंद करून अभ्यास करत होती. lत्याचवेळी घराशेजारी राहणाऱ्या आरोपींने त्या पीडित मुलीला पेपर वाचायला मागितला. त्यांनतर ती मुलगी पेपर आणायला घरात गेली असताना आरोपींन तिला किटकनाशक पाजले आणि तिच्यावर अत्याचार केला.

आरोपी हा पीडित मुलीच्या घराजवळ राहणारा असल्याने त्याने ओळखीचा फायदा घेत हे कृत्य केलं आहे. महिलांवरच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये ओळखचे, नातेवाई, मित्र यांच्याकडून होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण हे खूप जास्त आहे.

दरम्यान पीडित तरूणीच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरुडचे पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी दिली आहे.

आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला पायबंद  घालण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करून खटले चालवा अशी मागणीही महिला संघटनांनी केली आहे.

First published:

Tags: Crime news