मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

87 व्या वर्षीही सायकल चालवत अनवाणी फिरून दारोदारी देतात रुग्णसेवा; Covid योद्ध्याला कडक सलाम!

87 व्या वर्षीही सायकल चालवत अनवाणी फिरून दारोदारी देतात रुग्णसेवा; Covid योद्ध्याला कडक सलाम!

87 वर्षांचे डॉक्टर दांडेकर  विदर्भाच्या खेड्यांमधल्या घरा घरापर्यंत वैद्यकीय मदत पोहोचावी यासाठी दहा-दहा किलोमीटर सायकल चालवतात, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांचं कार्य अविरत सुरू आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

चंद्रपूर, 23 ऑक्टोबर : Coronavirus ची भयंकर साथ महाराष्ट्रात थोडी आटोक्यात येताना दिसते आहे, याचं श्रेय रुग्णसेवेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या कोविड योद्ध्यांना आहेच. पण आज महाराष्ट्रातल्या अशा एका योद्ध्याबद्दलची बातमी आली आहे की ऐकून तुम्ही खरोखर नतमस्तक व्हाल. गेली 60 वर्षं सायकलवर फिरून गरजू रुग्णांना मोफत सेवा देणारे एक डॉक्टर आजोबा या महासंकटातही अविरत आपली सेवा देत आहेत. 10 किमी सायकल दामटवत, तेही अनवाणी फिरून ते स्वतःच्या वयाची पर्वा न करता रुग्णसेवा करत आहेत.

डॉ. रामचंद्र दांडेकर असं या देवमाणसाचं नाव. वय 87 वर्षं. महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यात डॉ. दांडेकर गेली 60  वर्षं काम करत आहेत. ते मुळात होमिओपॅथीचे डॉक्टर. मनात आणलं असतं तर कुठल्याही शहरात सहज बस्तान बसवून आरामात प्रॅक्टिस करून 'सुखी' आयुष्य जगू शकले असते हे डॉक्टर. पण दांडेकर डॉक्टरांचं सुख खऱ्या रुग्णसेवेत होतं.

चंद्रपुरातल्या मूळ, पोम्भुर्णा आणि बल्लारशा या तीन तालुक्यांमधल्या दुर्गम गावांपर्यंत, तिथल्या घराघरापर्यंत वैद्यकीय उपचार पोहोचायला हवेत आणि त्यासाठी आपल्या शिक्षणाचा खरा उपयोग करायचा, असं डॉक्टरांनी तरुणपणीच ठरवलं. गेली 60 वर्षं ते या पद्धतीची रुग्णसेवा या तीन तालुक्यांमध्ये करत आहेत.

कोविड काळात वयाची साठी उलटलेल्या लोकांनी बाहेर पडू नये, अशा सूचना आहेत. वयाने ज्येष्ठ असलेल्या डॉक्टरांनाही शक्यतो या काळात संपर्क टाळायला सांगितला जात असताना दांडेकर डॉक्टर मात्र थांबलेले नाहीत.  "थांबून कसं चालेल? मी माझ्या दैनंदिन कामात खंड पडू दिलेला नाही. खेड्यापाड्यात रुग्णांना कोण औषधं पुरवणार. मी अजूनही 10 किलोमीटर सायकल चालवतो आणि घराघरात जाऊन रुग्ण तपासून औषधं देतो", डॉ. दांडेकर यांनी PTI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

डॉ. दांडेकरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अनवाणी जातात. अनवाणीच सायकल चालवतात. गरजू व्यक्तींकडून कुठलेही पैसे न घेता त्यांना तपासतात. औषधं देतात. होमिओपॅथीबरोबर आयुर्वेदिक औषधंही दांडेकर डॉक्टर देत असतात. त्यांच्या औषधांना गुण येतो, असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे.

Coronavirus सारखं जागतिक संकटसुद्धा या वयोवृद्ध डॉक्टरांना थांबवू शकलं नाही.

First published: