...तर RPI(गवई गट) बाहेर पडणार, काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का

अचलपूर आणि दर्यापूर या दोन जागांवर तडजोड नाही. या जागा मिळाल्या नाही, तर सर्व जागा लढवू आणि अमरावती जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडू, मग आम्हाला भाजपची 'बी' टीम म्हणू नका, असेही राजेंद्र गवई यांनी म्हटले आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2019 04:55 PM IST

...तर RPI(गवई गट) बाहेर पडणार, काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का

हर्षल महाजन, (प्रतिनिधी)

नागपूर, 24 ऑगस्ट- विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. अचलपूर आणि दर्यापूरची जागा दिली नाही तर चर्चा नाही, असा इशारा आरपीआय नेते राजेंद्र गवई यांनी दिला आहे. आमदार बच्चू कडूंच्या विरोधात निवडणूक लढण्याची इच्छाही राजेंद्र गवई यांनी व्यक्त केली आहे.

दर्यापूर आणि अचलपूर या दोन विधानसभेच्या जागा दिल्या नाही, तर आघाडीतून बाहेर पडणार, असा इशारा राजेंद्र गवई यांनी दिला आहे. गवई यांनी आघाडीकडे 10 जागांची मागणी केली आहे. परंतु अचलपूर आणि दर्यापूर या दोन जागांवर तडजोड नाही. या जागा मिळाल्या नाही, तर सर्व जागा लढवू आणि अमरावती जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडू, मग आम्हाला भाजपची 'बी' टीम म्हणू नका, असेही राजेंद्र गवई यांनी म्हटले आहे.

'वंचित'मध्ये जाण्याची इच्छा...

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जाण्याची इच्छा राजेंद्र गवई यांनी व्यक्त केली आहे. याबाबत लवकरच प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार, असेही ते म्हणाले. वंचित आघाडीने आघाडीसोबत निवडणूक लढवाव्यात, त्यांचे उमेदवार निवडून येतील, असेही ते म्हणाले.

Loading...

पुण्यातही काँग्रेसला हादरा?

काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार आणि प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट आपल्या मुलाची लग्न पत्रिका देण्यासाठी आहे, असं आमदार गाडगीळ यांच्याकडून सांगितलं जात आहे. मात्र या भेटीमागे काही राजकीय गणित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांची विधान परिषदेतील मुदत पुढच्या वर्षी संपत आहे. त्यामुळे आतापासूनच अनंत गाडगीळ यांनी शिवसेना प्रवेशासाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं बोललं जात आहे. गाडगीळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. कारण विधानपरिषदेतील काँग्रेसचे अभ्यासू आमदार अशी अनंत गाडगीळ यांची ओळख आहे.

VIDEO : आमच्याकडे डॅशिंग पावडर, मुख्यमंत्र्यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2019 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...