विदर्भात पुढील दोन दिवस मुसळाधार पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज

विदर्भात पुढील दोन दिवस मुसळाधार पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज

विदर्भात पुढील दोन दिवस मुसळाधार पावसाचा अंदाज आहे. नागपूर हवामान विभागाने हा मुसळाधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

  • Share this:

हर्षल महाजन, (प्रतिनिधी)

नागपूर, 3 सप्टेंबर: विदर्भात पुढील दोन दिवस मुसळाधार पावसाचा अंदाज आहे. नागपूर हवामान विभागाने हा मुसळाधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागात मंगळवारी संततधार पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस पुढचे काही दिवस अशाच प्रकारे कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी दिली आहे.

विदर्भात मान्सून दाखल झालेला असला तरीही अद्याप नागपूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. रविवारी, सोमवार आणि मंगळवारी नागपुरात पाऊसच झाला नाही. मात्र, बुधवारी नागपुरात चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होताच कालपासून नागपूर शहरात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता सर्वत्र काळोख पसरलेला होता. पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहेत. पावसाच्या सरी नागपूर शहरासह इतरही भागात पडत आहेत. यंदा मान्सूनचे आगमन मुळात देशातच उशिराने झाले. पण आज व उद्या चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसंपासून पावसाने दडी मारल्याने काही प्रमाणात वातावरणात उकाडा जाणवत होता मात्र सकाळ पासून रिमझिम सरी कोसळत असल्यामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे.

मुंबईसह कोकण परिसरात जुलैसारखा पाऊस; हवामान विभागाने दिला अलर्ट!

गणरायाच्या स्वागतासोबत राज्यात अनेक भागात पावसाला सुरूवात झाली आहे. विशेषत: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि कोकण परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईतील कुलाबा येथील हवामान केंद्रने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासात मुंबईसह कोकण परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करणाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्यासह पाऊस असल्यानं मच्छीमारांना आणि दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. तसेच किनारपट्टीवर चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

मंगळवारी दीड दिवसाच्या घरगुती गणपती बप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे. पहाटेपासून पावसाने बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गणपती विसर्जनादरम्यान पाऊसाचा जोर कमी व्हावा यासाठी भाविक गणरायाकडे प्रार्थना करत आहेत. पण सकाळपासून पावसाचा जोर वाढतच चालला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यातील किनारपट्टीभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हपूर, सातारा, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

राज्यातील काही भागांमध्ये आजही पावसानं दडी मारली असल्यानं बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मराठवाड्यात कृत्रिम पावसाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात मुसळधार पाऊस पडून दे आणि दुष्काळ दूर होऊदे असं गणरायाला राजकारणी नेत्यांपासून भाविकांपर्यंत सर्वांनी साकडं घातलं आहे.

मुंबई, कोकण, विदर्भ, छत्तीसगड, गोवा या भागांमध्ये पुढचे 48 तास मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे वातावरणात दिवसभर गारवा होता.

प्रेम करण्याची शिक्षा, तरुणीला अर्धनग्न करून रस्त्यावर बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

Published by: Sandip Parolekar
First published: September 3, 2019, 7:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading