मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विदर्भात अवकाळी पावसाने घेतला बळी, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

विदर्भात अवकाळी पावसाने घेतला बळी, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू आहे.

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू आहे.

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

हैदर शेख,(प्रतिनिधी)

चंद्रपूर,3 जानेवारी: विदर्भात अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. वीज पडून शेतकऱ्याचा जागेवर मृत्यू झाला आहे. पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा गावात शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रामन्नी देवलोहट (वय-55) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. जागली करून शेतातून सकाळी 6 वाजता परत येत असताना रस्त्यात रामन्नी देवलोहट यांच्या अंगावर विज पडून त्यांचा मृत्यू झाला. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू आहे.

गारपीटीसह अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात..

नववर्षाची सुरुवातीलाच गारपीटीसह अवकाळी पावसाने राज्यात अक्षरश: थैमान घातले आहे. नागपूर,अमरावती जिल्ह्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी गारपीट तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोलीत मुसळधार पावसाने झोडपले होते. दुसऱ्या दिवशीही या भागात ढगाळ वातावरण आहे.

नागपुर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील दिग्रस बुद्रुक, शिवाय कळमेश्वर तालुक्यातील मोहपा आणि सावनेर तालुक्यातील खापा परिसरात काल गारपीट झाली. बोरांच्या आकाराच्या या गारपिटीमुळे काही घरांच्या छताचे नुकसान झाले. नागपुरात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस आहे. गहू,चना पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी कडाक्याच्या थंडीने जोर पकडला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. काही भागात गारपीटही झाली. या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. कापूस आणि तूर पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यावर पुन्हा संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

मराठवाड्यातही मुसळधार पाऊस...

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली शहरात मुसळधार पावसाने काल झोडपले. सकाळी सहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यातीलही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. नववर्षातील पहिल्याच अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या तूर पिकाचे आणि शेतातील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, 2019 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका खरीप हंगामाला बसला होता. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. आता नववर्षाच्या सुरूवातीला झालेल्या अवकळी पावसामुळे आता रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी चिंतातूर झाला आहे.

First published:

Tags: Chandrapur, Chandrapur news, Farmer died, Rain, Vidarbha